निलंगा बंदला 100% प्रतिसाद
(मोईज़ सितारी)
निलंगा ः निलंगा शहरात कोरोना आजाराचे वाढते रूग्ण लक्षात घेवून काल शहरातील व्यापारी, नागरीक यांनी एक बैठक घेवून आजपासून पाच दिवसांसाठी निलंगा बंद स्वयंस्ङ्गूर्तपणे
पाळण्याचे आवाहन केले होते. आज पहिल्या दिवशी संपूर्ण निलंगा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. शहरातील छोटे-मोठे व्यापारी, नागरीक यांनी या बंदला चांगला प्रतिसाद दिला.
निलंगा शहरामध्ये अशात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. हे लक्षात घेवून व कोरोनाचा प्रसार होऊ नये त्याची साखळी तोडता यावी यासाठी
काल प्रशासनाच्या आदेशाची वाट न पाहता शहरातील व्यापारी, नागरीक, काही राजकारणी यांनी एकत्रीत येऊन आजपासून पाच दिवसांसाठी निलंगा शहर स्वयंस्ङ्गूर्तपणे बंद ठेवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. आज निलंगा शहर 100 टक्के बंद असल्याचे दिसून आले. मात्र, शहरातील वैद्यकीय सेवा, औषधी दुकाने, जीवनावश्यक वस्तू दुकाने सोडली तर सर्व दुकाने बंद होती. आडत मार्केट 15 तारखे पर्यंत बंद राहणार आहे शहरातील शिवाजी चौक, बाजार चौक याबरोबरच गल्लीबोळातील छोटी-मोठी दुकानेदेखील नागरिकांनी स्वयंस्ङ्गूर्तपणे बंद ठेवली होती.
निलंगा ची बातमी लातूर रिपोर्टर यूटूब वर अवश्य पहा व आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधे ज़रूर लिहा ज़रूर 👇
https://youtu.be/qSHNlBBS0-8
https://youtu.be/qSHNlBBS0-8
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.