दोन महिन्यांपासून वीजपुरवठा बंद
हिप्परसोगा ग्रामस्थ करणार उपोषण
औसा /प्रतिनिधी: तालुक्यातील हिप्परसोगा येथे मागील दोन अडीच महिन्यांपासून विद्युतपुरवठा बंद असून यामुळे ग्रामस्थांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.वारंवार विनंती करूनही विद्युत वितरण कंपनीकडून दुरुस्ती केली जात नसल्याने ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.यासंदर्भात विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, जिल्हाधिकारी, औसा येथील सहाय्यक अभियंता व औसा पोलीस ठाण्यात निवेदने देण्यात आली आहेत.
मागच्या दोन-तीन महिन्यांपासून हिप्परसोगा गावातील वीज पुरवठा बंद आहे.ग्रामस्थांनी या संदर्भात तक्रारी केल्या असता दुरुस्ती केली जाते परंतु काही वेळातच पुन्हा काहीतरी अडचणींनी वीज पुरवठा खंडित होतो.तीन महिन्यांपासून हीच स्थिती आहे. अनेक भागात तर एकदाही वीज आलेली नाही.यामुळे पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. जनावरांनाही पाणी मिळत नाही.सध्या खरीप हंगामात सोयाबीन फवारणीची कामे सुरू आहेत. फवारणीसाठीही पाणी उपलब्ध होत नाही. शाळा बंद असल्याने सर्वत्र ऑनलाईन शिक्षण विद्यार्थी घेत आहेत परंतु मोबाईलची चार्जिंग करणे शक्य होत नाही. पीठ दळून आणणे अवघड झाले आहे. गावात डासांची संख्या वाढली असून वीज नसल्याने पंखेही लावता येत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
यासंदर्भात लोदगा ,औसा येथे वारंवार निवेदने देऊनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.त्यामुळे ग्रामस्थांनी दिनांक २२ जुलै रोजी हिप्परसोगा येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.कोरोनाची स्थिती लक्षात घेता केवळ ११ ग्रामस्थ या उपोषणात सहभागी होणार आहेत.संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने विद्युतपुरवठा सुरळीत केला नाही तर उपोषणा शिवाय पर्याय नाही असे अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात शेतकरी संघटनाही सहभागी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी यांनी सांगितले.
या निवेदनावर सरपंच कविता कांबळे ,हेमंत पाटील, विठ्ठल संपते, संभाजी यादव, सचिन पाटील, समाधान कांबळे,बापू शिंदे,अंगद गोरे ,हनुमंत मंदाडे ,तुकाराम सोमवंशी ,बालाजी आळंदकर,मारुती चेवले ,सुहास पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
रोगप्रतिकार शक्ति बढ़ाने के लिए, जिस्म की कमज़ोरी दूर करता है.
जला, कटा, खरोंचे आयी? एंटी सेप्टिक दवाई जो ज़ख्म पर लगा सकते हैं और दवा के तौर पर गरम दुध में डाल कर पी सकते हैं. सोजीश दूर करती है




0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.