मौ. रामादेऊळगांव, मौ. जयपूरवाडी, मौ. पहेणी, हिंगोली शहरातील हरण चौक पेन्शनपुरा गोदावरील हॉटेल ते अशोक नाईक घरापर्यंतचा परिसर आणि औंढा तालुक्यातील मौ. अंजनवाडी कंटेनमेंट झोन घोषित
· सेनगाव तालुक्यातील मौ. केंद्रा खु. प्रतिबंध मुक्त
हिंगोली,दि.14: इमामोदीन शेख
हिंगोली तालुक्यातील मौ. रामादेऊळगांव, मौ. जयपूरवाडी, मौ. पहेणी मांव हिंगोली शहरातील हरण चौक पेन्शनपुरा गोदावरील हॉटेल ते अशोक नाईक घरापर्यंतचा परिसर आणि औंढा नागनाथ तालुक्यातील मौ. अंजनवाडी याठिकाणी कोविड-19 चा रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव इतरत्र होवू नये यासाठी वरील सर्व भाग/गावचे संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा नगर परिषद व ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
मौ. केंद्रा खु. हे गाव प्रतिबंध मुक्त
सेनगाव तालुक्यातील मौ. केंद्रा खु. हे गाव कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले होते. त्याचा कालावधी दि. 12 जुलै रोजी संपुष्टात आल्याने मौ. केंद्रा खु. हे गाव प्रतिबंध मुक्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
****
रोगप्रतिकार शक्ति बढ़ाने के लिए, जिस्म की कमज़ोरी दूर करता है.
जला, कटा, खरोंचे आयी? एंटी सेप्टिक दवाई जो ज़ख्म पर लगा सकते हैं और दवा के तौर पर गरम दुध में डाल कर पी सकते हैं. सोजीश दूर करती है




0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.