#कोरोनाच्या अनाहुत संकटावर मात करण्यासाठी मानवतेचा परिचय देत विविध क्षेत्रातील समाजघटक पुढे येताहेत. सामाजिक बांधिलकी जोपासत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या लढ्यात स्वयंस्फूर्त सहभागी होत आहेत. यातील एक ठळक नाव होय- #प्रा_डाॅ_फौजिया_खान !
सार्वजनिक आरोग्यासह एकूण 8 खाती यशस्वीरित्या सांभाळलेल्या माजी राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार !!
थोड्या वेळापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं आणि अत्यंत वाईट वाटलं. मैडमसारख्या #FrontLine_Warrior वर कोरोनाने घातलेला घाला घालमेल वाढविणारा होय. लाॅकडाऊनच्या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे चिरंजीव अली खान यांनी सर्वधर्मीय वस्त्यांमध्ये स्वखर्चाने 5 हजारांहून अधिक जीवनावश्यक वस्तुंच्या दर्जेदार किटचे केलेले वाटप असो अथवा मैडमनी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डाॅक्टर-कर्मचा-यांना दिलेली प्रोटेक्टिव साधनं; यातून त्यांच्यातील ओसंडून वाहणा-या मानवतेचे दर्शन घडले.
त्या राज्यमंत्री असताना मी त्यांचा शासकीय P.A. राहिलो असल्याने त्यांना जवळून जाणतो. त्यांचं मन इतरांसाठी जेवढं कोमल आहे तेवढ्याच त्या धाडसी आणि लढाऊ आहेत. इतरांच्या संकट आणि दुःखात धीर देणा-या मैडम धिरोदात्त असून त्या कोरोनावर लीलया मात करतील या विषयी यत्किंचितही चिंता करण्याचे कारण नाही !
दुस-यांचं कल्याण होवो हा विचार ज्यांच्या कायम मनात असतो त्यांचं कल्याणच होणार !!
भवतु सब्बं मंगलम् !
Getwel soon madam !!
*भीमप्रकाश गायकवाड*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.