औशात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पालिका करणार पेट्रोलिंग
औसा प्रतिनिधी/_
इलयास चौधरी
औसा शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 110 च्या वर गेली असून 9 जनास प्राणाला मुकावे लागले आहे ,शहरात किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी साठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि 10 वर्षाखालील लहान मुलांचा गल्ली बोळातील वावर थांबविण्यासाठी आता नगर परिषदेच्या वतीने पेट्रोलिंग साठी 24 तास कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ, अफसर शेख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत दिली ,या बैठकीत 50 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची थर्मामीटर व ऑक्सी मीटर द्वारे तपासणी करून ज्यांना त्रास होतो अशा नागरिकांची नियमित तपासणी करण्याचे ठरले आहे, कोविड केअर सेंटर मध्ये नियमित सॅनिटायझर फवारणीचे व्यवस्था पालिका करणार असून ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून येतील तो परिसर आरोग्य महसूल आणि नगर परिषदेच्या कर्मचाऱ्या मार्फत सील करावे ,असा ठराव घेण्यात आला आहे ,करोणा बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन सेंटर मध्ये MBBS डॉक्टरांची नियुक्ती करून आवश्यक त्या औषधांचा पुरवठा करावा ,औसा टी, पॉईंट पासून बस स्थानक पर्यंतच्या नालीतील गाळाचा उपसा करणे, किराणा व इतर व्यापारी आस्थापना सह बँकिंगच्या ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी नगर परिषद कर्मचारी नियुक्त करण्याचे ठरले आहेत ,शहरातील कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना नगर परिषदेमार्फत पाणी व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, वैद्यकीय सेवा संबंधितांच्या खर्चासह द्याव्यात असा ठराव मांडण्यात आला आहे ,
निर्जंतुकीकरण करण्यासाठी शहरात सोडियम हायड्रॉक्साइड ची फवारणी करावी, असेही व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बैठकीत ठरले असून आरोग्य सेतू अँप नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे, या बैठकीत मुख्याधिकारी तानाजी चव्हाण आणि सर्व सभापती नगरसेवक आणि नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.