घरगुती लाईट बील मार्च २०२० ते जुलै २०२० पर्यंत संपूर्ण लाईट बील माफ करण्याच्या मागणीसाठी एम आय एम चे निवेदन
प्रतिनिधी मुख्तार मणियार
औसा ए आय एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी,यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार मा.श्री इम्तियज़ जलील , महाराष्ट्र प्रदेश कार्यअध्यक्ष मा .श्री .गफ्फार कादरी ,यांच्या आदेशा नुसार आज एम आय एम औसा तालुक्याच्या वतीने .दी २१ जुलै २०२० सोमवार रोजी औसा तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांना घरगुती लाईट बील माफ करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात सध्या देशभरात व महाराष्ट्र राज्या मध्ये Covid19 ( कोरोना ) या नैसर्गिक महामारीने थैमान घातले असुन लाँकडाऊन काळातील मार्च २0२0 ते जुलै २0२0 पर्यंत चे पुर्णपणे लाईट बील माफ करावे . काही महीन्यापासुन देशात व महाराष्ट्र राज्या मध्ये लाँकडाऊन असल्याने राज्यातील सर्वसामान्य नागरीकांचे बेहाल झालेले असुन काम , धंदे , उध्योग , लघु उध्योग ,व्यापार बंद असल्यामुळे हातला रोजगार नसल्याने सर्वसामान्य नागरीक चिंताग्रस्त असल्याने आपल्या परीवाराचा पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सर्वसामान्य जनतेची आथिर्क परस्थिती बिकट झाली असून सर्व आथिर्क व्यवहार ,घेवान, देवान सध्या परीस्थितीत पुर्णपणे बंद असल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरीकांंच्या घरघुती वापरातील ( लाईट बील ) महाराष्ट्र सरकारने पुर्णपणे माफ करावे अशी प्रमुख मागणी चे निवेदन औसा तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांना दिले.या निवेदनावर एम आय एम पक्षाचे (माजी )लातुर जिल्हा उपाध्यक्ष तथा सिनियर नेते Adv. गफुरुल्लाह हाशमी, एम आय एम औसा प्रमुख अल्हाज सय्यद मूजफ्फर अली इनामदार , सय्यद कलिम , Adv. रफीक शेख,न्यामत लोहारे ,नय्युम शेख ,अजहर कुरेशी यांच्या सह्या आहेत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.