वैशिष्ट्यपूर्ण विकास योजनेच्या कामाची निविदा रद्द होणार
औसा मुख्तार मणियार
नगरपरिषदेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेतील मंजूर करण्यात आलेली कामे नियम बाह्य असल्याने ही निविदा रद्द करण्यात यावी अशी मागणी भाजपचे विरोधी गटनेते सुनील उटगे यांनी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडे केली आहे.ही विकास कामे विकास योजनेस अनुसरून असल्याबाबत नगर रचनाकार लातूर यांनी मान्यता दिली नाही.सदर कामासाठी घेण्यात आलेल्या ठराव नियमबाह्य असुन नगरपरिषद व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ नूसार सदर निवेदा तहकुब अथवा रद्द करण्यात यावी.व वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत मंजूर कामांच्या अनियमिततेची उच्चस्तरिय चौकशी करावी अशी मागणी भाजपचे सुनील उटगे नियोजन व विकास सभापती नगरपरिषद औसा यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी लातूर यांनी दि.२० जुलै रोजी मुख्याधिकारी यांना सदर निवेदन संबधी मुद्दे निहाय स्वंयस्पष्ट अहवाल सर्व कागदपत्रांसह ७ दिवसांत सादर करण्याचे सुचल्याने ह्या कामाची निविदा रद्द होणार अशी शहरात चर्चा सुरू आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.