माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून
कव्ह्यातील कंटेन्टमेंट झोनची पाहणी
लातूर दि.24/07/2020
देशात व राज्यात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. यामध्ये लातूर जिल्हाही मागे राहीलेला नाही. शहरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रूग्णाची संख्या वाढत आहे. दरम्यान लातूर तालुक्यातील कव्हा गावात एक कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला. परिणामी गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना दिलासा मिळावा तसेच या भागातील नागरीकांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी या भागातील कंटेन्टमेंट झोनची पाहणी करून नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी माजी आ. कव्हेकर यांनी कोरोना संदर्भात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना शासनाने जे मार्गदर्शक नियम केले आहेत, त्याचे पालन करावे, अशा सुचना दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत सुभाषअप्पा सुलगुडले, तंटामुक्ती अध्यक्ष भागवतराव घार, उपसरपंच किशोर घार, कांताप्पा पाठणकर, शिवशरण थंबा, तय्यब पठाण, नवनाथ बरूरे, लायक पठाण, विनोद पुरी, सचिन घार, नारायण माने, लक्ष्मण साखरे, नवनाथ मामडगे आदींची उपस्थीती होती.
------------------------------ --------------

------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.