राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कार्यवाही
उजनी व देवताळा येथे अवैध दारुसह २ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त
औसा मुख्तार मणियार
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्यानंतर जिल्ह्यात अवैध बेकायदेशीर मद्यविक्री, निर्मिती व वाहतूक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कार्यवाही सुरू केली आहे.औसा तालुक्यातील देवताळा व उजनी या ठिकाणी कार्यवाही करत देशी व विदेशी दारुसह २ लाख ३१ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपिंना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली २० जुलै २०२० सोमवार रोजी औसा तालुक्यातील देवताळा व उजनीसह दोन धाब्यावर अवैध मद्यविक्री विरोधात केलेल्या कार्यवाहीत ८ लिटर भारतीय बनावटीचे विदेशी दारु,१३३ लिटर देशी दारू तसेच एक वाहतूक करीत असणारे चार चाकी वाहन असा २ लाख ३१ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल या विभागाने जप्त केला आहे.या प्रकरणी अवैध दारू विक्री विरोध गुन्हा नोंदवून चौघांना अटक करण्यात आली आहे.हि कार्यवाही लातूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर एम बांगर, दुय्यम निरीक्षक एस आर राठोड, जवान अनिरुद्ध देशपांडे,निलेश गुणाले व हणमंत मुंडे यांच्या पथकाने केली.जिल्हयात अवैध व परराज्यातील मद्यविक्री वाहतूक होत असल्यास याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळविण्याचे आहवान अधिक्षक गणेश बारगजे यांनी केले असून अवैध दारू विक्री विरोधात यापुढेही मोहीम सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.