आता फक्त वैद्यकीय तसेच अपरिहार्य कारणांसाठीच ई-पास
हिंगोली, दि.23: जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून या अनुषंगाने उपाययोजना आवश्यक झाले आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात विनाकारण ये-जा करण्यासाठी ई-पासची मागणी होत असून काही नागरिक विनाकारण इतर जिल्ह्यात ये-जा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता केवळ वैद्यकीय तसेच अपरिहार्य कारणांसाठी इतर जिल्ह्यात ये-जा करण्यासाठीच यापूढे ई-पास देण्यात येणार आहे. याशिवाय इतर कारणांसाठी नागरिकांनी ई-पासची मागणी करु नये. कारण आता जिल्हा प्रशासनाकडून अशा मागण्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
वैद्यकीय कारणासाठी ई-पासची मागणीसाठी यापुढे आता केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, तालुका शासकीय रुग्णालय किंवा जिल्हा शासकीय, रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रच ग्राह्य धरण्यात येणार आहे. याशिवाय इतर कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.
कोणत्याही व्यक्तीने या आदेशाची अवज्ञा केल्यास सबंधीतास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005, साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 आणि फौजदार प्रक्रिया संहिता 1973 नुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
****
एअर मार्शल व्ही.ए. पाटकर
विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.23 : शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक विधवांच्या पाल्यांकडून एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी अर्जाची मागणी करण्यात येत आहे. इच्छूकांनी आपले अर्ज दि. 16 सप्टेंबर, 2020 पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कक्षाकडे संपर्क साधावा. तसेच कार्यालयात येताना सोबत ओळखपत्राची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टीफिकेट, 10 वी / 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, डिस्जार्च पुस्तकात कुटूंबाची नांवे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयीकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत आणावी.
जास्तीत-जास्त माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांनी केले आहे.
****
विविध क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन केलेल्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांनी
विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.23: जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन केलेल्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. यामध्ये खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविणारे माजी सैनिक, पत्नी, पाल्य आणि शैक्षणिक वर्षे 2019-20 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डात 95% पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापिठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व आयआयटी, आयआयएम व एम्स अशा नामवंत संस्थेमध्ये प्रवेश मिळविलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना सैनिक कल्याण विभागामार्फत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी पात्र असलेल्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असलेले कागदपत्रांसाठी दि. 16 सप्टेंबर, 2020 पूर्वी संपर्क साधावा. तसेच येतांना सोबत ओळखपत्राची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टीफिकेट, इयत्ता 10/12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, डिस्जार्च पुस्तकात कुटूंबाची नांवे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयीकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र इत्यादी आणावे.
या विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****
माजी सैनिक/विधवांच्या पाल्याना शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.23 : शासनाच्या सैनिक कल्याण विभागातंर्गत सन 2020 मध्ये इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी परीक्षेत किमान 60% गुण प्राप्त करुन पुढील शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांच्या, विधवांच्या पाल्यांसाठी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती येाजना राबविण्यात येणार आहे. ज्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी इयत्ता 10वी, 12 वी, मध्ये 60% गुण प्राप्त केले आहेत. त्यांनी आपले अर्ज दि. 15 ऑक्टोबर, 2020 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांच्याकडे कागदपत्रांसह सादर करावेत.
यामध्ये इयत्ता 10 वी व 12 वी व पदवी गुणपत्रिकेची छायांकित प्रत, सद्या शिकत असलेल्या इयत्तेचे बोनाफाईड सर्टीफिकेट, केंद्र, राज्य शासनाची, इतर शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा शाळा, महाविद्यालयाचा, संस्थेचा प्राचार्यांचा दाखला, ज्या पाल्यांनी सीईटी/जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्षे 2019-20 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे अशा पाल्यांना प्रकरणासोबत गॅप सर्टीफिकेट (स्वयंघोषणापत्र) घेऊन शिष्यवृत्तीची मंजुरी द्यावी, माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तकात कुटूंबाची नांवे असलेल्या पानांची किंवा रॅशन कार्डची छायांकित प्रत, मुलीचे वय 18 पेक्षा जास्त असल्यास मुलगी अविवाहित असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला, आर्थिक मदतीच्या पिवळ्या कार्डची छायांकित प्रत (दोन्ही बाजू), राष्ट्रीयीकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्ड इत्यादी कागदपत्र आपल्या अर्जासोबत जोडू अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.