गुरूकृपा होण्यासाठी मन निर्विषय झाले पाहीजे !
- सदगुरु श्री गुरूबाबा महाराज औसेकर.
----------------------------------------------------------
माणूस विषयापासून मुक्त होणें म्हणजे त्याचेवर गुरुकृपा झाली असें मानावे विषयासक्त माणूस हा मन आणि इंद्रियाचे अधीन होऊन गेल्यानेच परमार्थ साधनेस व सेवेस मुकतो. ज्ञान, दृष्टी, विचार, चिंतन यास पारखा होतो, असें विचार पिठाधिपती श्री. गुरुबाबा महाराज औसेकर यांनी व्यक्त केले.श्रावणमास अनुष्ठानात नित्य प्रासादिक चक्रीभजनानंतर श्री ज्ञानेश्वरीवरील निरूपणात ते बोलत होते.
ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायातील
"ते गा किरीटी मन ! या बोला नाही आन !
आता विषयाभिधान ! भेदू आइके !
तरी स्पर्शू आणि शब्दू ! रूप रस गंधू !
हा विषय पंचविधु ! ज्ञानेन्द्रियचा !!
( ओवी 116, 117 )
या चिंतनात महाराज म्हणाले की, मन हेच इच्छेला वाढवते, आशा प्रबळ करते, भय अस्थिरतेला खतपाणी घालते, माणसाचे द्वैत भावनेला अविधेला बळ देते, मनात संकल्प विकल्प निर्माण होतात आणि तो यात गुरफटतो, अडकून फसतो, बुद्धी अर्थात ज्ञानाचे प्रवेश द्वार झाकले जाते, तो त्या त्याच विषयात गुंततो. हें मन माणसाचे असें चपलख आहे, म्हणून मन निर्मळ स्वच्छ निर्विकारी असनेला खुप महत्व आहे ते नामस्मेरणात ठेवणे. नामाची, सेवेची. नित्य नेमाची सवय आपले मनाला लावणे जरुरीचे असते, याकरिता आपल्या पुर्वज्यांनी, हीं श्रावण चक्रीभजनाची अनुष्ठान सेवा, साधना आपणांस दिली आहे ती निष्ठेने करू या असें श्री गुरुबाबा शेवटी सांगतात.
आज श्री नाथ मंदिरात श्रावणमास अनुष्ठान निमित्त पहाटे काकडा, सकाळी रूद्र अभिषेक, सद्गुरु समाधीची पुजा व उत्सावातील परंपरेची नित्यनियम प्रतिवर्षाप्रमाणे सदगुरू श्री गुरूबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्याखाली, सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या नियोजनात व श्री श्रीरंग महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
-शब्दांकन: अॅड.शाम कुलकर्णी.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.