औसा विधानसभेतील गावास खा.ओमराजे निंबाळकर यांची भेट.
ला.रिपोर्टर प्रतिनिधी-औसा विधानसभेतील
औसा विधानसभेतील माळकोंडजी, सारोळा, एंरडी, आलमला, बुधोडा, मदनसुरी या गावास खा.ओमराजे निंबाळकर यांनी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने भेट देऊन सद्य स्थितीचा आढावा घेतला. नागरिकांशी चर्चा केली. आर्सेनिक अल्बम-30 या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्याचे वाटप करण्यास सुपूर्द करण्यात आल्या. नागरिकांना प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी,विधानसभा संघटक शेखर चव्हाण, तालुका प्रमुख सतिष शिंदे, , डॉ सचिन सगर, मनोज सोमवंशी, मारूती मगर, महेश जोशी, मिनाज शेख, औसा तहसीलदार सौ. शोभा पुजारी मॅडम, गटविकास अधिकारी श्री.भुजबळ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख, पोलीस निरीक्षक ठाकूर साहेब, तालुका कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी, पोलिस कर्मचारी आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.