हिंगोली जिल्ह्याची बातमी
जिल्ह्यात गत 24 तासात 58.37 मि.मी. पावसाची नोंद
हिंगोली,दि.3:इमामोद्दीन इशाअती
जिल्ह्यात दि.3 जुलै, 2020 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 58.37 मि लीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11.67 मि.मी. पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 242.89 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर 28.26 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दि. 3 जुलै, 2020 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) हिंगोली 12.00 (226.87) मि.मी., कळमनुरी 19.83 (200.15) मि.मी., सेनगांव 19.83 (284.87) मि.मी., वसमत 0.71 (191.30) मि.मी., औंढा नागनाथ 6.00 (311.25) मि.मी. पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 242.89 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.