शेतकरी करत आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग



शेतकरी  करत  आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
प्रतिनिधी मुख्तार मणियार औसा
औसा तालुक्यात खरीपाची पेरणी अनेक वर्षांनंतर मृग नक्षत्रात झाल्याने सध्या सोयाबीन,मूग उडीद,तूर अशी अनेक पिके सध्या समाधान कारक असून पिकाचे कीड आळीपासून संरक्षण करण्यासाठी शेतीच्या पेरणीपूर्वी मशागती पासून फवारणी पर्यंत आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली आहे.शेतात राबणारे मनुष्यबळ आणि मजूराचा आभाव असल्याने शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळला आहे.पिकावर फवारणीसाठी ट्रॅक्टरला कॉम्प्रेसर मशीनद्वारे नळयांना नोजल बसवून औषध फवारणी सुरवात केली आहे ट्रॅक्टरला सिंटेक्स टाकी बसवून कीटकनाशक औषधांचे मिश्रण तयार करून शेतकरी कमी खर्चात शेतातले फवारणीची प्रक्रिया सुरू करून वेळ व पैशाची बचत करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.शेतीमध्ये वाढती महागाई आणि उत्पन्नाचा वाढता खर्च टाळण्यासाठी शेतकरी आधुनिक यंत्राद्वारे शेती करण्यासाठी प्राधान्य देत आहेत.त्यामुळे मनुष्यबळाची अडचण सध्यातरी सुटल्यासारखी दिसत आहे.





आपल्या मराठवाड़ा च्या बातम्या  साठी आमच्या  संकेतस्थल वर  क्लिक करा 
http://www.laturreporter.in
व 
आमच्या  ऐप ला डाउनलोड करा 
http://www.appsgeyser.com/11279086
आमचा यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा 

https://www.youtube.com/channel/UCL-tXWUd4Zxvh6F2jAHk91g
खालील  जागेवर रिपोर्टर नेमने आहे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या