डिजिटल शाळेच्या माध्यमातून प्रत्येक गावात जनजागृती करणार : आ. संभाजीराव पाटील निलंगेकर




डिजिटल शाळेच्या माध्यमातून प्रत्येक गावात जनजागृती करणार : आ. संभाजीराव पाटील निलंगेकर
निलंगा : कोरोणा विषाणू संसर्ग आता समुह संसर्गाकडे वळाला असून याकरीता ग्रामीण भागातील लाकांन मध्ये संतत जनजागृती करणे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून येणार्‍या पंधरवाड्यात प्रत्येक गावातील डिजेटल शाळेच्या माध्यमातून लोकांची अधिकारी वर्ग, आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधीची सुसंवाद साधून त्यांच्या मध्ये कोरोणा विषाणू बाबत जनजागृती करणे गरजेचे असत्याचे प्रतिपादन आ. संभाजीराव पाटल निलंगेकर आढावा बैठकीत केले.
येथील उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात आज माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी कोरोना विषाणू बाबत अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. यावेळी भाजपाचे युवा नेत अरविद पाटील निलंगेकर, नगराध्यक्ष बाळासाहेब (श्रीकांत) शिंगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, निलंगा तहसिलदार गणेश जाधव, देवणी तहसिलदार सुरेश घोळवे, शिरुर अनंतपाळ तहसिलदार अतुल जटाळे, निलगा गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, देवणी मनोत राऊत, शिरुर अनंतपाळ नंदकिशोर शेरखाणे, न प मुख्याधिरी मल्लीकार्जन पाटील , आरोग्य अधिकारी डॉ, श्रीनिवास कदम अदि उपस्थित होते.
कोरोणा विषाणूचा संसर्ग आता शहरी भागातून ग्रामीण भागात आला आहे. याकरीता आता ग्रामीण भागातील भागातील यंत्रणा सुसज्ज करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच या भागातील जनते मध्ये याकरीता जनजागृती करणे आवश्यक आहे. शहरी भागातील राहणीमाण व ग्रामीण भागातील राहणीमाना मध्ये भरपूर फरक असतो त्यामूळे आपल्या कायमच जनतेची सुसंवाद साधुन त्यांच्या मध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. या करीता आपल्या विविध योजना अंमलात आणून काम गरजेचे आहे. त्या बरोबरच सर्वाची सुरक्षिता ही महत्वाची आहे.
सध्या मतदार संघात आपले गाव स्वास्थ्य व सुरक्षा अभियाना अंतर्गत थरर्मल मीटर व ऑ्नसीजन मीटर व्दारे नागरीकांची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी सर्व पदाधिकारी, सरपंच,ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी,तलाठी, आशा ताई व बीएलओ यांच्या मार्फत करण्यात येत आहे. यात देवणी मधील 23497 , शिरुर अनंतपाळ 5929,व निलंग्यातील 1400 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. या तणासणी दरम्यान शहरातील व मदनसुरी येथील प्रत्येकी एक रुग्णाची कोरोना तपासणी करणे गरजेचे आहे असे लक्षात आल्यानंतर ते दोन्ही रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता आनची सुक्ष्म पध्दती ही तपासणी करण्याच्या सुचना आ. निलंगेकर यांनी केल्या आहे.
कोरोणा या आजारा पासून भयभीत होण्यापेक्षा त्या वाचण्यासाठी उपाय योजना करणे गरेजा आहेत. त्या तरी प्रत्ये कुटुबांत एक कोराना योध्दा तयार करणे गरजेचे आहे. याबरोबर कुटुबांती प्रत्ये सदस्याची रोगप्रतिकाराक शक्ती वाढविण्यासाठी आजीचा, बटवा, योगासणे व वनस्पती औषधाचा वापर करणेही  गरजेच्या असल्या बाबत जनजागृती व प्रसार करणे गरजे असल्याचे सांगितले.
कोरोणा विषाणू हा आता आपल्या भागातही समूह संसर्गात आला असून या करीता आरोग्य यंत्रणेही सांगितलेल्या सुचनाचे तंतोत पालन करणे गरतेचे आहे. त्या बरोबरच शासना या करीता ठरवून दिलेल्या नियमाचे पालनही काटेकोर पणे करणे गरजे आहे. या करीता प्रथम नागरीकांन मध्ये विविध उपाय योजनेतू प्रसिध्दी करुन त्यांच्या नंतर काही ठिकाणी कारवाईही करणे गरजेचे असल्याचे सुचनाही आ. निलंगेकर यांनी अधिकार्‍यांना केल्या.  
या बैठकी नंतर माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा शहरातील कन्टेंनमेंट झोन ची पाहणी करुन अधिकार्‍यांना सुचना केल्या.
आपल्या मराठवाड़ा च्या बातम्या  साठी आमच्या  संकेतस्थल वर  क्लिक करा 
http://www.laturreporter.in
व 
आमच्या  ऐप ला डाउनलोड करा 
http://www.appsgeyser.com/11279086
आमचा यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा 

https://www.youtube.com/channel/UCL-tXWUd4Zxvh6F2jAHk91g
खालील  जागेवर रिपोर्टर नेमने आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या