औशात नगरपालिका व पोलिस प्रशासनाची धडक कार्यवाही
औसा=मुख्तार मणियार
औसा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून नागरिक भयभीत झाले आहेत तालुक्यातील आतापर्यंत 5 जनांचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे .दि.5 जुलै 2020 रोजी औसा शहरातील खडकपुरा भागात 2 पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात ठेवून 60 वर्षां वरील वृध्दाना लॉकडाऊन पर्यंत दुकानात व्यवहार करता येणार नाही असे आदेश दिले आहेत.तसेच मास्कचा वापर प्रत्येकांना अनिवार्य केला असून मोटरसायकल वर दोघांना जाण्यास बंदी केली आहे तसेच अॅटोरिक्शा व कारमध्ये डॉयव्हरला वगळून फक्त दोघांना प्रवास करता येणार आहे त्यामुळे औसा शहरात पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाने शहरातील वाढती गर्दी टाळण्यासाठी विनामास्क फिरणा-यां नागरिकांना दंड आकारुन दि.6 जुलै रोजी हजारो रुपयांचा दंड नियमांचे उल्लंघण करणा-या कडून केला आहे.औसा तहसील ,आरोग्य विभाग आणि नगरपालिका प्रशासनाने खडकपुरा भागातील कोरोना बाधित क्षेत्राचा परिसर सील केला असुन, नागरिकांनी आवश्यक गर्दी टाळावी असे आवाहन केले आहे. मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी नगरपालिकेच्या कर्मचा-यांना सोबत घेऊन दुचाकी वर डबल सिट आणि चारचाकी वाहनांतून क्षमते पेक्षा अधिक प्रवास करणाऱ्या व मास्कचा वापर न करणा-यावर दंडांत्मक कार्यवाही केली आहे.औसा नगरपरिषदे मार्फत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ शींदे हे स्पीकर वरुन विना मास्क फिरु नये, तसेच दुचाकी वर दोन पेक्षा अधिक नागरिकांनी प्रवास करू नये , म्हणून जनजागृती करीत असूनही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघण होत नसल्याने नियम तोंडणाऱ्याना दंड आकारला जात आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.