मंठा येथील तरुणीच्या हत्येप्रकरणी नराधमावर कठोर कारवाई करा
चाकूर तालुका
भाजयुमोची मागणी
चाकूर /प्रतिनिधी :जालना जिल्ह्यातील मंठा येथे तरुणीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी नराधमावर कठोर कारवाई करून महिला वर्ग आणि माळी समाजाला न्याय द्यावा, या मागणीचे निवेदन चाकूर तालुका भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.
काही दिवसांपुर्वी मंठा येथे एका निरपराध तरुणीची हत्या करण्यात आली.हत्या करणाऱ्या नराधमावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.त्यामुळे त्याला कडक शासन करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.यावर्षी सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात बोगस निघाले असून त्याची विक्री केल्याबद्दल संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिल पूर्णपणे माफ करावे, आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
तहसीलदारांना निवेदन देताना भाजयुमोचे तालुकाध्यक्ष दयानंद सुर्यवंशी पाटील,जिल्हा उपाध्यक्ष विकास गुरमे,तालुका सरचिटणीस भरत गुरमे, तालुका सरचिटणीस राम मिरकले,विष्णू कमाने,तालुका उपाध्यक्ष पांडुरंग कोते,संदीप चांगुले,साई हिपाळे , अतुल जंपनगिरे,तुकाराम गुड्डे , रमाकांत गुरमे,आकाश शेळके , जगदीश भोसले,योगीराज पाटील,रोहन जाधव यांच्यासह युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.