हिंगोली जिल्ह्यातील पिडीत महिलांनी महिला लोकशाही दिनात समस्या मांडण्याचे आवाहन




हिंगोली  जिल्ह्यातील पिडीत महिलांनी महिला लोकशाही दिनात समस्या मांडण्याचे आवाहन
हिंगोली, दि.14:  इमामोदीन शेख राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी/ अडचणी यांचे शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
            या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करुन जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना प्रश्न मांडून त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक होण्यासाठी महिला लोकशाही दिन हा एक उत्तम मार्ग आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली येथून उपलब्ध करुन घ्यावेत. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्र न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
            जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****



रोगप्रतिकार शक्ति बढ़ाने के लिए, जिस्म की कमज़ोरी दूर करता है.
जला, कटा, खरोंचे आयी? एंटी सेप्टिक दवाई जो ज़ख्म पर लगा सकते हैं और दवा के तौर पर गरम दुध में डाल कर पी सकते हैं. सोजीश  दूर करती है



मिलने का पता

WHealthier clinic
Faazilpura, Aurangabad

Order online..
9067678678

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या