कारोनाच्या पाश्वभूमिवर जनतेची वाढीव विजबील तात्काळ माफ करा
भाजपा युवा मोर्च्यातर्फे अजित पाटील कव्हेकरांच्या उपस्थितीत अभियंत्याला साकडे
लातूर दि.07/07/2020
कोरोनाच्या संकटामुळे आर्थिकदृष्ट्या होरपळून निघालेल्या जनतेला लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच महावितरण कार्यालयाने वाढीव विजबीले देऊन सर्वसामान्य ग्राहकांना विठीस धरण्याचा प्रयत्न महावितरणाने सुरू केला आहे, त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वसामान्यांचे वाढीव विजबील तात्काळ माफ करा, अशा मागणीचे निवेदन भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत महावितरणचे मुख्य अभियंता, झोन लातूर यांना देण्यात आलेले आहे.
कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रासह देशभरातील रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गेल्या चार महिण्यापासून लॉकडाऊनच्या परस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे सर्व सामान्य जनता आर्थिक दृष्ट्या होरपळून निघालेली आहे. तसेच गरीबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यातच बहुतांश उद्योगधंदे बंद पडल्यामुळे अनेक तरूणांच्या नोकरीवर बेकारीचा कुर्हाड कोसळलेली आहे. त्यातच महावितरण खात्याने सर्वसामान्य जनतेला लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिले देवून सर्वसामान्य नागरीकांची थट्टा केली आहे. त्यातच मा.ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत यांनी 30 जून 2020 रोेजी प्रसारमाध्यमाद्वारे वाढीव बीलाचे जाहीर समर्थन करून वीज बिलाची माफी न करता तीन टप्प्यामध्ये वीज बिलाचे हप्ते पाडून वीज बील वसुलीचे आदेश दिले आहेत. तरीही वीजबिल न भरल्यास सर्वसामान्य नागरीकांची वीज जोडणी तोडण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आतातरी राज्य सरकारने याबाबीकडे लक्ष देवून कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबील माफ करून जनतेला दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन महावितरणचे मुख्य अभियंता झोन लातूर यांना भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले. या निवेदनावर नगरसेवक विशाल जाधव, प्रेम मोहिते, अॅड.गणेश गोजमगुंडे, अमोल गित्ते, निखील गायकवाड,वैभव डोंगरे, सागर घोडके, आकाश बजाज, विनोद मोकाशे, सचिन जाधव, उमेश इरपे, राजेश पवार,आकाश पडीले, रंजित गवळी, संतोष जाधव, वैभव वनारसे, प्रकाश काळे, व्यंकटेश हंगरगे, अनिल पाटील, महादेव पिटले, आकाश पिटले यांच्यासह भाजपा युवा मोर्च्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.