करियर म्हणजे काय ? ऑनलाइन मालिका सुरु





जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र लातूर कार्यालयाकडून ‘विविध क्षेत्रातील शिक्षणाच्या आणि करिअरच्या संधी’ या विषयावर काही सत्रांची ऑनलाईन मालिका सुरु करीत आहोत. करिअर म्हणजे काय ? करिअर कसे निवडावे ? करिअरसाठी आवश्यक असलेली आपली आवड व क्षमता कशी तपासून पहावी ? विविध शाखांमध्ये कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आणि ते अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरीच्या व व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ? अशा विविध विषयांवरील माहिती विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना आणि नागरिकांना उपलब्ध करून देणे हा या मालिकेचा उद्देश आहे. सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर अशा विविध क्षेत्रातील मान्यवर ही सत्रे घेणार आहेत. 
या सत्रांपैकी पहिले ऑनलाईन सत्र दि. ०१ जुलै २०२० रोजी दुपारी ०२.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. या सत्रामध्ये ‘करिअरशोध चाचणी’ याविषयी एमकेसीएलचे मराठवाडा पूर्व आणि सोलापूर विभागाचे समन्वयक श्री. महेश पत्रिके सादरीकरण करणार आहेत. meet.google.com/pzv-vays-ibf या लिंकवरून तुम्ही सत्र जॉईन करू शकता. आपल्या संपर्कातील सर्व VTP, शाळा आणि महाविद्यालयापर्यंत ही माहिती पोहोचवावी असे आवाहन करण्यात येत आहे.
- राजू वाकुडे. सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, लातूर.



उमर फारुख युवा मंच औसा च्या वतिने आमदार अभिमन्यु पवार याना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या