औसा मुख्तार मणियार
औसा शहरात बागवान समाजाची लोकसंख्या मोठी आहे.मात्र कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे दफनविधी करण्यास अनेक अडचणी येत आहेत.बागवान समाजाने प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही जागा मिळत नव्हती.अखेर बागवान समाजाच्या वतीने आ. अभिमन्यु पवार यांच्याकडे कब्रस्थानाच्या जागेसाठी निवेदन देऊन मागणी केली होती.निवेदन दिल्यानंतर आ. अभिमन्यु पवार यांनी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांना पत्र देऊन बागवान समाजाच्या कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती केली होती.त्या अनुषंगाने आमदारांच्या पत्राची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी कब्रस्तानासाठी जागा तात्काळ उपलब्ध करून द्यावी,असा आदेश औसा नगरपालिकेला दिला आहे.यावेळी आ.पवार यांनी मरणानंतर किमान माझ्या मतदार संघातील विविध समाजातील लोकांना गाव आणि शहरात स्मशानभूमी तसेच दफनभूमी असलीच पाहिजे यासाठी माझा पहिला प्रयत्न आहे असे आढावा बैठकीत असे आवाहन अभिमन्यु पवार यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.