औशात कोरोनातुन बाहेर आलेल्या व्यक्तींचे स्वागत
औसा मुख्तार मणियार
औसा शहरातील ढोर गल्ली येथील दि २३ जुलै रोजी कोरोनातुन बाहेर घरी परत आलेल्या तिघांचे कुटुंबातील सदस्य, गल्लीतील लोक, शेजारच्या मंडळींनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.येथील कटके कुटुंबातील ६५ वर्षीय महिला त्यांचा ४० वर्षीय मुलगा,आठ वर्षीय नात या सर्वांना कोरोनाची बाधा झाली होती.यातील आजी व नात यांना गुरुवारी पाठविण्यात आले.या दोघांची काळजी घेण्यासाठी कोरोनातुन बाहेर आलेल्या छोट्या मुलीचे वडील स्वत: अन्य पाॅझिटिव्ह रुग्णासोबत आठ दिवस राहिले. यासर्व मंडळींना रुग्णवाहिकेतून घराजवळ आणून सोडण्यात आले,तेव्हा शेजारच्या मंडळींनी या कुटुंबाचे फुले उधळुन,औक्षण करून व फटाके वाजवून जंगी स्वागत केले.या अनोख्या स्वागतास या भागातील नागरिक मोठ्या संख्येने टाळया वाजवत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिले होते.या स्वागतामुळे कोरोना मुक्त झालेले तिघेही भारावून गेले होते.यावेळी कोरोनावर मात करून आलेल्या या युवकांनी औसा कोव्हीड केअर सेंटरमध्ये आपल्या घरीही एवढी व्यवस्था वेळेवर होऊ शकत नाही,तेवढी व्यवस्था शासन, प्रशासनाने केली आहे.तहसिलदार शोभा पूजारी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ अंगद जाधव, डॉ म्हस्के, डॉ सानप, डॉ नागरपुरे तेथील आरोग्य सेविका,सेवक यांनी अतिशय चांगली सेवा केली आहे.त्या सर्वांचे या कुटुंबाने आभार व्यक्त केले आहे.आज या कुटुंबासह पांच जनांना सुट्टी देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.