लॉकडॉन मुळे मरखेल लोणी हानेगाव येथ कडकडित बंद मरखेल वार्ताहर संतोष चिद्रावार
कडेकोट बंदोबस्त :संचारबंदीला उस्फुर्त प्रतिसाद
मरखेल (प्रतिनिधी ) कोरोनाचा ग्रामीण व शहरी भागत मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 13 जुलै ते 20 जुलै पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून शहरी सह ग्रामीण भागत उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून मरखेल हणेगाव लोणी परिसरातील नागरिकांनी घराच्या बाहेर न पडता संचारबंदीच्या नियमाचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे.
आजपर्यंत शहरापुरता मर्यादित असलेला कोरोना ग्रामीण भागातही पाय पसरू लागल्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आता अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाले आहे.
विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे अन्यथा विनाकारण बाहेर पडून नियमाचे उल्लंघन केल्यास अशा व्यक्तीविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल तसेच पोलीस हे आपले शत्रू नसून मित्र आहेत आपण घरीच राहून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नयें घरी रहा सुरक्षित रहा असे आवाहन मरखेल पोलीस स्टेशनचे सपोनि आदित्य लोणीकर यांनी केले असून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून आजपर्यंत सुरक्षित असलेली गावे आता हळूहळू कोरोनाच्या विळख्यात येत असून बाहेर निघाल्यानंतर चेहऱ्यावर मास्क न आढळल्यास व दुचाकीवर दोघे प्रवास करत असतील तर त्यांनाही दंड आकारण्यात येणार असून मेडिकल, दवाखाने 24 तास उघडे राहणार असून अन्य आस्थापने बंद असतील या नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कार्यवाही करण्यात येणार असून विशेष करून महाविद्यालयीन विध्यार्थी व नोकरीच्या शोधात असलेले युवक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यास त्यांना नोकरी मिळणे अवघड होईल त्यासाठी त्यांनी काळजी घ्यावी.


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.