*निलंगा येथील महिला औद्योगिक सहकारी संस्था स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी..*
*निलंगा /मोहन क्षीरसागर*
*येथील स्वस्त धान्य दुकान नंबर.१२ या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी येथील लोकलढा समिती व कार्डधारकांच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.*
*याबाबत अधिक माहिती अशी की,येथील महिला औद्योगिक सहकारी संस्था स्वस्त धान्य दुकान नं.१२ या दुकानाशी जवळपास एक हजार लाभार्थी जोडले गेलेले आहेत.*
*सदर चे दुकानदार हे अधिकाऱ्यांना हाताशी धरून दिनदलित, गोरगरिबांचे,कष्टकऱ्यांचे धान्य काळ्याबाजारात विक्री करीत आहेत.कार्डधारकांना त्यांच्या हक्काचे गहू तांदूळ,साखर डाळ,युनिटप्रमाणे वितरित करीत नाहीत.*
*स्वस्त धान्य दुकानदारांकडून वितरण केलेल्या, अन्न धान्याच्या पावत्या दिल्या जात नाहीत.*
*प्रत्येक कार्डधारकांना प्रत्येक महिन्यांचे अन्न-धान्य वितरीत केले जात नाही.*
*स्वस्त धान्य दुकानदार महिन्यामध्ये फक्त चार दिवस त्यांच्या सोयीनुसार दुकान उघडे ठेवतात.व त्यांच्या मर्जीतील काही मोजक्या लोकांना रात्री अपरात्री राशन वितरीत करतात.*
*शासनाने निर्धारीत केलेल्या वेळेत दुकान बंद असते व वाटपही बंद असते.सदरील स्वस्त धान्य दुकान* *कार्डधारकांच्या वास्तव्यापासून ३ कि.मी दूर अंतरावर आहे.*
*त्यामुळे अनेक महिला वृद्ध लोकांची ससेहोलपट अर्थात गैरसोय होत आहे.*
*सदर दुकानदार ह्या महिला असल्याने त्यांच्या सोबतीला माल वितरणासाठी अल्ताफ शेख नावाचा गुंड प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीला दुकानात बसवून ठेवतात.*
*या व्यक्तीमुळे कार्डधारकां मध्ये दहशततीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर दुकानदार हे वजन काट्याप्रमाणे धान्य वितरित न करता लोखंडी डब्याने अंदाजे कमी प्रमाणात धान्य वाटप करतात.*
*याबाबत सुज्ञ कार्डधारकांनी विचारपूस केली असता आमचा तराजू काटा लॉक झाला आहे.असे उडवा उडवी चे उत्तरे दिली जातात.*
*प्रसंगी सदर दुकानात बसवलेला गुंड प्रवृत्तीचा अल्ताफ शेख नावाचा व्यक्ती मारझोडही करतो.*
*व जबरदस्तीने मशीनवर अंगुठे लावून घेतो.शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे रक्कम न घेता ज्यादा दराने रक्कम वसूल करून कार्डधारकांची आर्थिक लूट करतो.*
*सदरील स्वस्त धान्य दुकानात धान्याचा भावफलक,दुकानाचे नामफलक लावलेला नाही.दुकानांमध्ये ठेवलेले तक्रार पुस्तक कार्डधारकांना दिले जात नाही.*
*त्याचप्रमाणे कार्डधारकांना माझ्या विरुद्ध तक्रार दिली तर याद राखा अशा गुंडामार्फत धमक्या देत असल्याने त्यांच्यावर कारवाई करून रेशन दुकानाचा परवाना तत्काळ रद्द करण्यात यावा.*
*अशी मागणी येथील लोकलढा समितीचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते खलील हमीदसाब लालटेकडे व दोनशे एकोन्नतीस कार्डधारकांच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.*
*तात्काळ कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.*
*मोहन क्षीरसागर ,निलंगा*
*मो 9421377707*
*मो 9325270286*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.