महापालिका शाळेतील विद्यार्थ्याना
शालेय साहित्याचे वाटप
भारत विकास परिषदेचा उपक्रम
लातूर /प्रतिनिधी:भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने महापालिका शाळा क्रमांक ९ मधील विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
शहरातील गोरगरीब नागरिकांची मुले महापालिकेच्या शाळातून शिक्षण घेतात.आर्थिक स्थिती बिकट असल्याने अनेकवेळा पालक विद्यार्थ्याना शालेय साहित्य घेवून देऊ शकत नाहीत. ही अडचण ओळखून महापालिका शाळा क्रमांक ९ च्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याना शालेय साहित्य देण्यासंदर्भात विनंती करणारे पत्र भारत विकास परिषदेला दि.१३ जुलै रोजी पाठविले होते. त्याची तात्काळ दखल घेत मंगळवारी, दि.१४ रोजी शाळेतील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्याना साहित्य देण्यात आले.नववीच्या ४५ आणि दहावीच्या ३५ अशा एकूण ८० विद्यार्थ्याना शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके आणि रजिस्टर देण्यात आली.
भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेचे अध्यक्ष विश्वास लातूरकर,उपाध्यक्ष बालाजीराव बिरादार,सहसचिव योगेश काळे, शिरीष कुलकर्णी,शाळेचे मुख्याध्यापक भिंगोले आदींची यावेळी उपस्थिती होती.
कोरोनामुळे असणारे निर्बंध लक्षात घेता दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थीनींना प्रातिनिधीक स्वरूपात साहित्याचे वितरण करण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्याचे साहित्य मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आले असून त्यांच्यामार्फत ते विद्यार्थ्याना घरपोच केले जाणार आहे. या शाळेतील विद्यार्थी अभ्यासात चांगले असून शाळेने आयएसओ प्रमाणपत्र मिळवलेले आहे.असे प्रमाणपत्र मिळवणारी ही महापालिका क्षेत्रातील पहिलीच शाळा आहे.भारत विकास परिषदेने विद्यार्थ्याची गरज ओळखून साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्याध्यापक भिंगोले यांनी परिषदेचे आभार मानले.
रोगप्रतिकार शक्ति बढ़ाने के लिए, जिस्म की कमज़ोरी दूर करता है.
जला, कटा, खरोंचे आयी? एंटी सेप्टिक दवाई जो ज़ख्म पर लगा सकते हैं और दवा के तौर पर गरम दुध में डाल कर पी सकते हैं. सोजीश दूर करती है




0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.