महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
बीड प्रतिनिधी | 15 जुलै 2020
''ताळेबंदीतून मुक्ती आज होईल, उद्या होईल या आशेवर मी बसलो आहे. ती वर्गणीची पूर्ण फी आणि रूमचे भाडे मी घरी असतानासुद्धा भरतोय." अश्या भावना व्यक्त करत मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील एका युवकाने थेट मुख्यमंत्र्यांना ई-मेल द्वारे संवाद साधत मदतीची हाक दिली आहे.
बीड जिल्ह्यातील धर्मापुरी येथील कु.धनंजय तुळशीराम फड या वर्ग ११ वीत शिकत असलेल्या विध्यार्थ्याने, विध्यार्थी आणि पालकांच्या भावना जाणून घेऊन थेट ई-मेलद्वारे मुखयमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. लॉकडाउनच्या काळात विध्यार्थ्यांची आणि पालकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक त्याने त्यात नमूद केली आहे. विनाकारण वसुल केले जात असलेले रूम भाडे आणि वर्गात बसत नसतानासुद्धा क्लासेस वाले पूर्ण फीस वसूल करत असल्याचे त्याने म्हटले आहे, तसेच पुन्हा पुन्हा फी साठी विचारणा करून क्लासेसवाले विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देत आहेत असे त्याने आपल्या पत्रात विशेषतः नमूद केले आहे.
त्याने नेमकं ई-मेल मध्ये काय लिहिलं ?त्याच्याच शब्दात-
"माननीय मुख्यमंत्री महोदय,
महोदय,मी धनंजय तुळशीराम फड आज तुम्हाला लिहिण्याचा योग आला, कारण ताळेबंदीतून मुक्ती आज होईल उद्या होईल या आशेवर मी बसलो आहे .ती वर्गणीची फी आणि रूम चे भाडे मी घरी बसून असतानासुद्धा चालू आहे.
खरंतर,रूमवरून सामान आणावं म्हटलं तर त्याठिकाणी जावं कस,आणि गाडीतर येणार कोणाची असे एक ना अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होत आहेत.आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताळेबंदीमुळे आम्ही घरी बसून अभ्यास करतोय आणि मोबाइलला रिचार्जपण आम्हीच करतोय पण क्लासेस वाले फी मात्र वर्गात बसून शिकण्याची पूर्णपणे घेत आहेत वरून पुन्हा पुन्हा फोन करून फी साठी विचारणा करत आहेत.
साहेब,आम्ही शेतकऱ्याची तसच मोलमजुरी करणाऱ्या माय बापाची मुलं ताळेबंदीत सगळं कामकाज ठप्प पडलं असताना इतके पैसे कसे आणि कुठून जुळवायचे तुम्हीच सांगा.साहेब,शेवटी ही एक नैसर्गिक आपत्ती आहे प्रत्येकाने एकमेकांना सहाय्यता केली पाहिजे ,पण या लोकांच्या कृतीतून हे दिसत नाही.
आशा करतो ,तुम्ही या गोष्टीकडे जातीने लक्ष घालून आम्हा विद्यार्थी व पालकांचा प्रश्न मार्गी लावाल.
अशा शब्दात ,धनंजय फड याने महत्वाची भूमिका मांडत आपल्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
संबंध परिस्थिती पाहता जगावं की मरावं, जगावं तर कसं, आणि मरावं तर सरणासाठी लाकडं कुठून आणावं अशी अवस्था झाली आहे. त्याने लिहिलेलं हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय पण अद्यापही शासनाने याची दखल घेतली नाही.शासनाने या विषयात लक्ष घालावे असे मत कमेंट्सच्या माध्यमातून विध्यार्थी तसेच पालकांकडून करण्यात येत आहे.
रोगप्रतिकार शक्ति बढ़ाने के लिए, जिस्म की कमज़ोरी दूर करता है.
जला, कटा, खरोंचे आयी? एंटी सेप्टिक दवाई जो ज़ख्म पर लगा सकते हैं और दवा के तौर पर गरम दुध में डाल कर पी सकते हैं. सोजीश दूर करती है





0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.