ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी* *आजी - माजी सरपंच,ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारीच 'योग्य'व्यक्ती





*ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी*
*आजी - माजी सरपंच,ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारीच 'योग्य'व्यक्ती.*


*आमदार अभिमन्यू पवार यांची पालकमंत्री महोदयाकडे मागणी.*

*औसा - मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात येत असताना या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमण्यात येणारी व्यक्ती ही ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनुभवी व्यक्ती असावी यासाठी  प्रशासक म्हणून आजी- माजी सरपंच,ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी एका व्यक्तीस प्रशासक पदासाठी 'योग्य' व्यक्ती समजून नियुक्ती करावी अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमीत विलासरावजी देशमुख यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.*

 *औसा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या औसा तालुक्यातील ३६ व निलंगा तालुक्यातील १९ अशा ५९ ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांच्या पाच वर्षाचा कार्यकाल जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान संपत आहे.सद्य स्थितीत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सदरील ग्रामपंचायतीच्या निवडणुका शक्य नसल्याने पालकमंत्री यांच्या सल्ल्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा ग्रामपंचायतीवर योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आदेश  निर्गमित केले आहेत.कोरोना विषाणू प्रादुर्भाव च्या काळात संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी व स्थानिकांना योग्य मदत करण्यासाठी ग्रामपंचायतीची सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक सह इतर ग्रामपातळीवरील आशा व अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस आदी कर्मचारी यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका लक्षात घेता वरीलपैकी ग्रामपंचायतीच्या कारभाराचा अनुभव असणारी व्यक्ती ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदी 'योग्य' व्यक्ती ठरेल या व्यतिरीक्त ग्रामपंचायत कामाचा फारसा अनुभव नसलेली व्यक्ती प्रशासक म्हणून नियुक्त केल्यास कोरोना नियंत्रण व त्यासाठी स्थानिक स्तरावर करावयाच्या उपाययोजना यावर विपरित परिणाम होईल.शिवाय गावातील अंतर्गत मतभेद ,मनभेद तसेच पक्षीय राजकारण उफाळून कोरोना नियंत्रण व अन्य ग्रामविकासाच्या योजना राबविण्या बाबतीत अडचणी निर्माण होतील.याचा मोठा परिणाम गावातील विकास कामावर होवू शकतो यामुळे संबंधित गावचे आजी-माजी सरपंच ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी एका व्यक्तीस प्रशासन पदी योग्य व्यक्ती समजण्यात यावे व त्यानुसार प्रशासकीय नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमीत विलासरावजी देशमुख यांच्याकडे  पत्राद्वारे केली आहे.

*आमदार अभिमन्यू पवार हे लातूर येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत असल्याने व ते प्रत्यक्षात भेटुन मागणी करु शकत नसल्याने त्यांनी याबाबत पालकमंत्री ना अमित विलासरावजी देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून निवेदन पालकमंत्री महोदय यांच्याकडे पाठवत असल्याचे व सदर मागणीनुसार प्रशासक नियुक्ती बाबत कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.*



रोगप्रतिकार शक्ति बढ़ाने के लिए, जिस्म की कमज़ोरी दूर करता है.
जला, कटा, खरोंचे आयी? एंटी सेप्टिक दवाई जो ज़ख्म पर लगा सकते हैं और दवा के तौर पर गरम दुध में डाल कर पी सकते हैं. सोजीश  दूर करती है


मिलने का पता

WHealthier clinic
Faazilpura, Aurangabad

Order online..
9067678678

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या