माजी आ. कव्हेकरांच्या वाढदिवसानिमित्त
सर्वोपचार रूग्णालयात मोफत अन्नदान
लातूर दि.13/07/2020
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यसमितीचे विशेष निमंत्रित सदस्य तथा भाजपा नेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस कौटुंबिक, सामाजिक, अध्यात्मिक अशा विधायक उपक्रमाने शनिवारी साजरा करण्यात आला. यामध्ये जे.एस.पी.एम.चे समन्वयक निळकंठ पवार यांच्या पुढाकारातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय येथे रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत अन्नसेवेचा उपक्रम घेण्यात आला. यासाठी वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे लातूर अध्यक्ष दत्ता माळी यांचे सहकार्य लाभले.
यावेळी निळकंठराव पवार, कमलाकर कदम, विजय बारबोले, सतीश साळुंके आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याबरोबरच अंबाजोगाई रोडवरील मातोश्री वृध्दाश्रमात गणेश पवार व शिवाजी सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत अन्नदान करण्यात आले.
---------------------------

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.