देवणी जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखेत पिकविमा कार्यशाळा संपन्न.
लातूर येथे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळ बैठकीत पिकविमा संदर्भात सर्वांना माहिती देवुन त्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रात कार्यशाळा घेण्याचे आदेशीत केले होते. याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे देवणी विभागाचे संचालक भगवानराव पाटील विजयनगरकर यांनी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 13 जुलै रोजी देवणीच्या जिल्हा बॅंक शाखेत पिकविमा कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेतुन चालू खरीप हंगामातील पिकांचा विमा भरून घेण्यासंदर्भात बॅंक शेतकर्यांच्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार असून याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी देवणी तालुक्यातील सर्व चेअरमन, व्हा.चेअरमन, गटसचिव, इन्स्पेक्टर,बॅंक कर्मचारी यांना बोलावण्यात आले होते. यावेळी सर्वांना माहिती देवुन पिकविमा भरण्यासाठी शेतकर्याना सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन संचालक भगवानराव पाटील विजयनगरकर यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळेसाठी उपस्थित प्रत्येक व्यक्तीला संचालकानी वैयक्तिक स्वखर्चाने एक लिटर चे शानीटाईझर व मास्क चे वाटप केले आहे.
सर्वांना सुरक्षितता बाळगून काम यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. देवणी तालुका कर्ज वसुलीत जिल्हात तिसरा आला असून पिकविमा भरून घेण्यासंदर्भातील या कार्यातही अव्वल क्रमांक मिळवेल अशी आशाही संचालक भगवानराव पाटील विजयनगरकर यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा बॅंकेचे उप सरव्यवस्थापक टि. एम. जाधव, फिल्ड ऑफिसर गणेश भाटकर, देवणी बाजार समितीचे माजी सभापती गोविंदराव भोपणीकर, माजी जि.प.सदस्य दिलीप पाटील नागराळकर आदींची उपस्थिती होती. या कार्यशाळेसाठी तालुक्यातील सर्व चेअरमन, व्हा. चेअरमन, गटसचिव, इन्स्पेक्टर व सोसायटी सदस्य उपस्थित होते.


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.