औसा नगर परिषदेची विशेष सभा नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न





औसा नगर परिषदेची विशेष सभा नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
औसा मुख्तारमणियार 
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर औसा नगर परिषदेची विशेष सभा दि. २० जुलै २०२० सोमवार रोजी १२ वाजता विडिओ कॉन्फरन्स द्वारे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या विशेष सभेला नगरपालिकाचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत नगरपालिकाचे १६ सदस्य उपस्थित होते.यावेळी विशेष सभा मध्ये मा. जिल्हाधिकारी लातूर यांच्या लाॅकडाउनच्या बाबतच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी,व औसा नगरपरिषदेने स्वॅब तपासणी मसिन/ टेस्ट किट खरेदी करण्यात यावे जेणेकरून लातूर जिल्ह्यामध्ये फक्त ५०० नागरिकांचे स्वॅब तपासणी होत आहे, आपल्या लगत असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दररोज ३००० नागरिकांची स्वॅब तपासणी होने आवश्यक आहे या संदर्भात पालकमंत्री लातूर यांना निवेदन देण्याचे ठरले.औसा शहराची परत एकदा सोडियम हायपोक्लोराइड ची फवारणी करावी, यावेळी हाशमी चौक ते हनुमान मंदीरापर्यंत ची मोठी नाली जे सी बी ने व मनुष्यबळ लावुन काढणे,औसा शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास तो भाग तहसिलदार औसा, आरोग्य अधिकारी यांच्या सुचनेनुसार ताबडतोब सील करून त्या भागात बॅरिकेड्स करण्यात यावे व त्या भागांचे व घरांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे,कंटेनमेंट झोन मध्ये औसा न प.कडुन पाणी,दुध, भाजीपाला,किराणा माल, वैद्यकीय सेवा आदि संबंधितांच्या खर्चासह घरपोच द्यावे.दुस-या टप्प्यांमध्ये औसा शहरातील ५० वर्षांवरील व्यक्तीची थर्मामीटर व pulse oximeter ने जवळपास ३५०० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आले आहे.त्यापैकी गंभीर आजार असलेल्या व्यक्तीची नियमित तपासणी करण्यात यावी तसेच ५० वर्षांवरील व्यक्तीची यादी व कर्मचाऱ्यांची वBLo ची यादी सर्व सदस्यांना देण्याचे ठरले.अशी माहिती नगर परिषदेच्या विशेष सभा मध्ये नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी विडिओ कॉन्फरन्स द्वारे सर्व नगरपालिकाचे सदस्यांना दिली.यावेळी या सभेला मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, नगरपरिषदेचे सदस्य भरत सुर्यवंशी,मुजाहेद शेख, गोविंद जाधव,परविन शेख, जावेद शेख,रुमा काझी,किर्तीबाई कांबळे,समिना सय्यद,नजमुनबी इनामदार,जहॉरा तत्तापुरे,अंगद कांबळे,मंजूषा हजारे, सुनील उटगे, उन्मेश वागदरे,शिल्पा कुलकर्णी, सुहास डेंग, तसेच न गर परिषदेचे कर्मचारी सभा अधिक्षक महेमूद शेख, लेखापाल गणेश शिंदे आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या