*माझी आई आणि परिचारिका*
यांचे खूप जवळचे नाते आहे कारण माझी आई व्यवसायाने परिचारिका आहे . आई हा शब्द डोळ्यासमोर हि आला तरी जग जिंकण्याचा आनंद प्रत्येकाला होत असावा .कारण या शब्दाने मला खूप आनंद होतो. मी आधार ,धैर्य ,समाधान यामध्ये सामर्थ ,यश ,इच्छापूर्ती या सर्व गोष्टी तिच्याकडून सहज रित्या अंगी घेतले आहेत.
यातच संपूर्ण जगावर आलेलं संकट म्हणजे कोरोना विशानु यालाच जागतिक आरोग्य संघटनेने महामारी म्हणून घोषित केली. त्यावेळी माझ्या आपल्या देशात मार्च महिन्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन घोषित केले .त्याच वेळी माझ्या आईची कोरोना वार्ड लाच ड्युटी चालू होते. पण त्यावेळी आपल्या लातूर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आलेला नव्हता. त्याच वेळेपासून खऱ्या अर्थाने वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व व्यक्तिमत्त्व यांना ओळखण्याची पारखण्याची संधी मला मिळाली.
परिचारका व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्तीला काय काय त्यागावे लागते .याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. रात्रभर जागे राहून रुग्णांच्या सर्व गोष्टींची मूल्यमापन करून औषधांचा डोस ठरवावा लागतो यालाच रात्रीचा दिवस करणे असे म्हणावे लागेल. एका एका रुग्णांचा जीव वाचवण्याची जबाबदारी आज वैद्यकीय क्षेत्रावर आहे आणि ते जिमेदारी चौक पणाने पार पाडताना आपण सर्वजण टीव्ही चानल वर पहात आहोत. यामध्ये पोलीस प्रशास नाच मोलाचा वाटा आहे. मी एका व्यवसायाने परिचारिका असणाऱ्या व्यक्तीची मुलगी आहे .याचा मला सार्थ अभिमान आहे परिचारिका संवर्गात काम करणाऱ्या जगातील देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील विशेष म्हणजे लातूर येथील विलासराव देशमुख ैद्यकीय शिक्षणात शिक्षण संस्था लातूर येथे काम करणार्या सर्व परिचारिकांना माझा मानाचा मुजरा.
हे जग कायमस्वरूपी तुमचे ऋणी राहील. यात काही शंका नाही. शेवटी तुमच्यासाठी या चिमुकली कडून छोटीस शब्द रुपी वंदना.
*प* _परिचारिकेचे वर मात
*री_* रुग्ण सेवा
*चा_* चौक काम
*री*_रात्रंदिवस एक करणे
*का_* काटेकोर पालन
कु . *अश्विनी शरदचंद्र देवणीकर*
वर्ग आठवी
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.