हिंगोली, कळमनुरी शहरातील काही भाग तसेच मौ. रेडगांव कंटेनमेंट झोन घोषित

हिंगोली, कळमनुरी शहरातील काही भाग तसेच मौ. रेडगांव कंटेनमेंट झोन घोषित
·   कळमनुरी तालुक्यातील मौ. चिखली (नवी) आणि मौ. डिग्रस वंजारी प्रतिबंध मुक्त
 
          हिंगोली,दि.20: इमामोदीन शेख 
हिंगोली शहरातील नारायण नगर येथील डॉ. भाकरे यांच्या घराच्या आजू बाजूच्या 500 मिटर पर्यंतचा परिसर क्र. 2 चिराऊ दवाखाना ते बांगर दवाखाना, जिल्हा परिषद रोड, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय कंपाऊंड पर्यंत, पलटन गल्ली क्र. 4 डॉ. जफर यांच्या घराच्या आजू बाजूच्या 500 मिटर पर्यंत क्र. 2 शाहाने यांच्या घरापासून पोलीस अधीक्षक यांच्या घरापर्यंत,  रिहाना सागर सय्यद यांच्या घराच्या आजु बाजुचा 500 मिटर चा परिसर, रिसाला झोपडपट्टी गल्ली ते आधार दवाखान्यापर्यंतचे क्षेत्र तर कळमनुरी शहरातील भाजी मंडी ते जुना पोलीस स्टेशन व भाजी मंडी ते अलीम कादरी यांच्या घरापर्यंतचा भाग तसेच कळमनुरी तालुक्यातील मौ. रेडगांव याठिकाणी कोविड-19 चा रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव इतरत्र होवू नये यासाठी वरील सर्व भाग/गावचे संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या  सेवा नगर परिषद मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.
            या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
 कळमनुरी तालुक्यातील मौ. चिखली (नवी) हे गाव प्रतिबंध मुक्त
            कळमनुरी तालुक्यातील मौ. चिखली (नवी) व मौ. डिग्रस वंजारी ही गावे कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले होते. त्याचा कालावधी संपुष्टात आल्याने ही गावे प्रतिबंध मुक्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
****

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 23 रुग्ण
·   जिल्ह्यात 100 रुग्णांवर उपचार सुरु
 
 
हिंगोली, दि.20: जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्याकडून आज रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 23 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना केअर सेंटर्सचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे. खडकपुरा हिंगोली येथील सात जण, तालाबकट्टा हिंगोली येथील पाच जण, वार्ड क्र. 1 बालाजी नगर सेनगाव येथील तीन जण, वार्ड क्र. समता नगर सेनगाव येथील एक जण , स्वानंद कॉलनी वसमत येथील एक जण, आखाडा बाळापूर येथील तीन जण, कांडली कळमनुरी येथील दोन जण  आणि रेडगांव कळमनुरी येथील एक जण असे एकुण 23 जणांना कोविड-19 ची लागण झाली आहे.
तसेच आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगाली येथील 4 तर कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत 7 असे एकूण  11 कोविड-19 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथे भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 4 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे.  जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 410 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 310 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 100 रुग्णांवर उपचार चालू आहेत.****  
--

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या