औसा तावरजा प्रकल्प कोरडाच
औसा=मुख्तार मणियार
पावसाळा सुरू होऊन उलटत असताना तालुक्यातील कोनत्याही प्रकल्पातील जलसाठ्यात पाण्याची शुन्य टक्के वाढ आहे.शहरातील औसेकरांचा जिवणदायी
आणि जवळपास पन्नास हजारांहून अधिक लोकांच्या पाण्याची तहान भागविणारा तावरजा प्रकल्प क्षेत्रात अजूनही म्हणावा तसा पाऊस न पडल्याने अजुनही हा प्रकल्प कोरडाच आहे त्यामुळे चिंतचे वातावरण पसरले आहे.एकीकडे खरीप हंगामाला पोषक पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला असताना पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील पावसाची सरासरी पाहता नेहमी अत्यल्प पावसामुळे पाणी टंचाईसह शेतीवर मोठे संकट उभे राहिले आहे.मागच्या वर्षी तर ऐन दिवाळीपासूनच शहराला तिवर पाणी टंचाई निर्माण झाली होती. दिवाळी पासून महिना व पंधरा दिवस याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येत होता.उन्हाळयात तावरजा प्रकल्पात बुडक्या घेऊन पाण्याची तहान भागविण्यासाठी पालिकेने आटापिटा केला. त्यामुळे काही प्रमाणात पाणी पुरवठा करण्यास मदत झाली.मात्र ऊन्हाळा जसा जसा वाढत गेला , त्याप्रमाणे टंचाई अधिकच भीषण झाली.तावरजा प्रकल्पात चांगला आणि पोषक पाऊस पडला तर अंदाजे 27.727 दक्ष लक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा प्रकल्पात साठवू शकतो .योग्य नियोजन व पाण्याचा अपव्यय टाळल्यास दोन वर्षी तरी तहान भागते. सध्या शहरात असलेल्या सार्वजनिक विहिरी,कुपन नलिकाच्या माध्यमातून होत आहे.पाऊस चांगला पडत असल्याने शहरातील बोर आणि विहीरीला फायदा झाला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.