किल्लारी ग्रामीण रुग्णालयास सुधीर पोतदार यांची भेट वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचा युवा मंच तर्फे सत्कार





किल्लारी ग्रामीण रुग्णालयास  सुधीर पोतदार यांची भेट

 वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचा युवा मंच तर्फे सत्कार



 औसा प्रतिनिधी

तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथील डॉक्टर्स नर्स व सर्व कर्मचाऱ्यां चा ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक संस्था चे संस्थापक संचालक प्राध्यापक सुधीर पोतदार यांच्यामार्फत सत्कार व सन्मान करण्यात आला.  औसा तालुक्यातील उत्कृष्ट ग्रामीण रुग्णालय म्हणून गेली दहा वर्ष किल्लारी ग्रामीण रुग्णालय काम करत आहे तालुक्यातील किल्लारी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात सूक्ष्म नियोजपूर्वक कार्य करण्यात येत असून सर्वत्र  कोरोना ने हाहाकार माजला आहे.परंतु  किल्लारी येथील रुग्णालय परिसरात  सर्व कर्मचारी  खूप चांगले कार्य सुरू आहे त्यामुळे आज पर्यंत तरी या परिसरात रुग्ण आढळून आले नाहीत. या रुग्णालयात निलंगा औसा व  उमरगा तालुक्यातील बरेच पेशंट किल्लारी ग्रामीण रुग्णालयात येतात.



 आलेल्या सर्व नागरिकांना उत्तम प्रकारची सुविधा या रुग्णालयातील  कर्मचारी देतात. त्यामुळे  या परिसरात किल्लारी ग्रामीण रुग्णालया चा नवलोकिक आहे. यामुळे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात. त्यामुळेच येथे असणारे वैदयकीय अधिकारी नर्स व इतर कर्मचारी प्रामाणिक पने रुग्ण सेवा करतात. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत रुग्णालयास भेट देत प्रा. सुधीर पोतदार यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला यावेळी किल्लारी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुजाता पाटील ,वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन बालकुंदे, डॉ.दोडके,डॉ हळदे , जोशी, बी.पी. पोतदार, प्रयोगशाळा तज्ञ स्वामी, शेळके,  सचिन कदम,  दोडतले, हॉस्पिटलचे वाहनचालक  जयराम गायकवाड, तसेच कर्तव्यावरील परिचारिका श्रीमती गंगापुरे,श्रीमती तांबाळकर,श्रीमती गायकवाड, वर्ग 4 चे कर्मचारी  अनंत गायकवाड, राजू बनसोडे ,शेख मुजीब आणि ऑफिस लिपिक बोधगिरे यांचा सत्कार शाल श्रीफळ व ुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.यावेळी प्रा. सुधीर पोतदार सामाजिक कार्यकर्ते ,व सुधीर पोतदार युवा मंच चे निलेश बिराजदार , किरण माने आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या