सामाजिक व अध्यात्मिक उपक्रमाने वाढदिवस साजरा होणार..!
लातूर दि.06/07/2020
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यसमितीचे विशेष निमंत्रित सदस्य तथा भाजपा नेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस दरवर्षी विविध उपक्रमाने साजरा केला जातो. पंरतु या वर्षी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सत्कार समारंभाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे यंदा फक्त कौटुंबिक, सामाजिक, अध्यात्मिक अशा विधायक उपक्रमाने 11 जुलै 2020 रोजी वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
यामध्ये धार्मिक कार्यक्रमात गौरीशंकर मंदिर, सिध्देवर मंदिरात अभिषेक, शेखमियाँ दर्गा, सुरशहावली दर्गा चादर चढविणे हे उपक्रम होणार आहेत तर सामाजिक उपक्रमामध्ये मातोश्री वृध्दाश्रमामध्ये व हासेगाव येथील सेवालयामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच जननायक साप्ताहिकाच्या “माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर गौरव विशेषांकाचे” व शिवाजी महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या “झेप” या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. परंतु वाढदिवसानिमित्त करण्यात येणारा विशेष सत्कार समारंभ यंदा होणार नसल्यामुळे सर्व पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फोनवरच शुभेच्छा देवूनच वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर वाढदिवस संयोजन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब कोरे यांनी केले आहे.
---------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.