भाजपा औसा तालुका सचिव पदी सचिन पाटील यांची निवड
औ सा ( प्रतिनिधी ) जवळगा पो. येथील स्व.माजी सरपंच साहेबराव व्यंकटराव पाटील यांचे चिरंजीव तथा विद्यमान सरपंच अमोल साहेबराव पाटील यांचे मोठे बंधू सामाजिक राजकीय कार्यात सतत अग्रेसर असलेले धडाडीचे कार्यकर्ते सचिन साहेबराव पाटील यांची सामाजिक राजकीय व मोठ्या जनसंपर्क कार्याची दखल भारतीय जनता पार्टी ने घेवून त्यांना भाजपा औ सा तालुका पदी औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू जी पवार यांनी नियुक्ती देवून अभिनंदन केले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍड. वागदरे, अड. कुलकर्णी, तालुका अध्यक्ष सुभाषराव जाधव, संतोषप्पा मुक्ता आदी मान्यवर उपस्थित होते. धडाडीचे कार्यकर्ते तथा भाजपा औसा तालुका नूतन सचिव सचिन पाटील यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.