आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाला यश... अतिवृष्टीचे रखडलेल्या ८ हजार १०२ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार अनुदान





आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाला यश... 
अतिवृष्टीचे रखडलेल्या ८ हजार १०२ शेतकऱ्यांच्या  खात्यावर जमा होणार अनुदान .. 
औसा=मुख्तार मणियार
औसा - गेल्या आॅक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरिप पिकांच्या झालेल्या भरपाईपोटी शासनाने दोन टप्प्यांत अनुदान उपलब्ध करून दिला होता. यापैकी काही शेतकऱ्यांना अनुदान वाटप झाले नसल्याने हे अनुदान वाटप करण्याबाबत औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागणी केली असता.याबाबत आमदार अभिमन्यू पवार यांनी नागपूर व मुंबई येथील अधिवेशनात हा मुद्दा मांडून शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप करण्याची मागणी केली होती.त्याच्या या प्रयत्नाला यश आले असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हि रक्कम जमा केली जाणार आहे. 
गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरिप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.याबाब आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यावेळी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून या नुकसानची पाहाणी करित या नुकसानचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.एकंदरीत राज्यात सत्ता स्थानाचे गलबते सुरू असताना राज्यपालांनी खरिप पिकासाठी ८ हजार रुपये व फळबागासाठी हेक्टरी १८ हजार अनुदान तात्काळ देण्याचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने तालुक्यातील बहुतांश शेतकर्‍यांना अनुदान मिळाले मात्र या अनुदापासुन औसा तालुक्यातील ८ हजार १०२शेतकऱ्यांचे ५ कोटी ७५ लाख २३ हजार ८३२ रुपयांचे अनुदान रखडले होते. याबाबत औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे बेलकुंड (ता.औसा) येथील शेतकऱ्यांनी अनुदान मिळाले नसल्याची व्यथा मांडली असता याबाबत आ. पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या औरंगाबाद येथे अनुक्रमे जानेवारी फेब्रुवारी मध्ये झालेल्या आढावा बैठकीत हे अनुदान देण्याची मागणी वारंवार मागणी केली होती.या बरोबरच लातूरचे जिल्हाधिकारी व नागपूर व मुंबई येथील अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेत राज्यपालांनी घोषित केलेले अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान देण्याबाबत तसेच राज्य शासनाने शपथविधी पुर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे वचन दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत द्यावी, भाजीपाला पिकांच्या नुकसानीपोटी जिरायत प्रमाणे अनुदान न देता फळबागेच्या नुकसानी प्रमाणे हेक्टरी अनुदान द्यावे तसेच हि नुकसानीची मदत २ हेक्टर मर्यादेपर्यंत ची अट न ठेवता सरसकट उपलब्ध जमीन व नुकसानीच्या अनुषंगाने द्यावी अशी मागनिचे  औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या या पाठपुरव्यास अखेर यश आले असून अनुदान रखडलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या