लातूर शहरात केावीड१९ चा वाढता पा्रदूर्भाव
रोखण्यासाठी तातडीने उपायोजना राबवा
महापालीका आढावा बैठकीत पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश
लातूर प्रतिनिधी_
कोवीड१९ रूग्णावर उपचार करण्यासाठी लातूरात सर्व प्रकारच्या सुवीधा उभारण्यात आल्या आहेत असे असले तरी या साथीची लागणच होणार नाही किंवा हा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी महानगरपालीकेने सर्वतोपरी उपाययोजना आखुन त्यांची काटेकोर अमंलबजावणी करावी, असे निदे्रश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
सोमवार दिनांक ६ जुलै रोजी दुपारी शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी लातूर महानगरपालीकेचे पदाधिकारी व विविध विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत शहरात वाढत चाललेल्या कोविड १९ प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी शहरातील सध्याची कोविड १९ प्रादुर्भाव परिस्थिती, मनपा कडून करण्यात येणाऱ्या उपाय योजना, कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूचा पुरवठा यासह अनेक विषयाची माहिती घेतली व त्यानंतर काही महत्वपुर्ण सुचना केल्या. या बैठकीस लातूर महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, स्थायी समीती सभापती दीपक मठपती, विरोधी पक्ष नेते दिपक सुळ, परीवहन सभापती बीरजदार व आयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लातूर शहर मनपा हद्दीत गेल्या काही दिवसात वाढत असलेले कोविड१९ रुग्ण संख्या पाहता आता हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाय योजना तात्काळ राबवाव्यात, कोविड१९ सेंटर मधून उपचार घेऊन निगेटीव्ह आहवाल आलेले रुग्ण होम कोरनटाईन मध्ये राहतील याकडे प्रत्येकाने लक्ष दयावे. विवाह सोहळ्यासाठी महापालीकेचेही नाहरकत प्रमाणपत्र असावे, नागरीकांच्या प्रबोधनासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, आवश्यकतेनुसार रॅपीड टेस्टचे प्रयोग राबवावेत, नागरीकांच्या इच्छेनुसार कोवीड१९ पॉझटीव्ह रूग्णांनाही होमकॉरनटाईनमध्ये उपचार करावेत, कंटेनमेंट झोनच्या नियमाचे काटेकोर पालन करावे, बाहेरगावी जाणाऱ्या आणि येणाऱ्या नागरीकावर लक्ष ठेऊन आवश्यकतेनुसार त्यांना सक्तीने क्वॉरनटाईन करावे, झोननिहाय उभा करावयाच्या आरोग्य केंद्राचे प्रस्ताव तातडीने करावेत असे निर्देश देऊन यासाठी शासनाकडून सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री ना. देशमुख यांनी दिले.
लातूर शहरात वीलगीकरण कक्षासाठी इमारत कींवा जागेचा शोध घ्यावा शहरा लगत असलेल्या गावामधून येजा करणाऱ्या नागरीकावर त्या त्या गावकऱ्याच्या मदतीने नियंत्रण आणावे यासाठी ॲटी कोरोना फोर्सच्या स्वंयसेवकांची मदत घ्यावी अशा सुचनाही त्यांनी केल्या.
उदयोग भवन परीसराचा प्रश्न मार्गी लावा
उद्योग भवन परीसर व औद्योगिक वसाहतमधील व्यवसायीक व नागरीकांचे प्रश्न आहेत ते समजून घ्यावेत त्यातून सन्मानीय तोडगा काढण्या संबंधी प्रस्ताव तयार करून पाठवावा अशी सुचना पालकमंत्री देशमुख त्यांनी केली.
मनपा मालकीच्या गाळेधारकांची समस्या सोडवा
लातूर महानगर पालीका मालकीच्या व्यापारी संकंलात गाळे धारकांच्या भाडेवाढीची समस्या बरेच दिवसा पासून प्रलंबीत आहे. महापालीकेचे पदाधिकारी व अधिकारी यांनी या गाळे धारकांच्या शिष्टमंडळा सोबत बसुन एक आठवडयच्या आत तोंडगा काढावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
शहरातील स्वच्छतेवर लक्ष दया
सदयाची कोवीड१९ प्रादूर्भावाची परिस्थीती आणि पावसाळयाचे दिवस लक्षात घेऊन शहरात कुठेही अस्व्च्छता होणार नाही यासाठी महापालीकेने मोहीम राबवावी. ठिकठीकाणी दिसणारे कचऱ्यांचे ढिग तातडीने उचलावेत अशा सुचना देऊन् या संबंधाने असलेल्या अडचणी सोडवीण्यासाठी आठवडा भरात बैठक घेतली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी मनपा उपआयुक्त लता फड, सहआयुक्त श्रीमती गुरमे, श्रीमती डाके, बंडू किसवे, संजय कुलकर्णी, समाधान सुर्यवंशी, प्रदीप चिद्रे, श्री.काझी, श्री. ताकपिरे यांच्यासह लातूर मनपा मधील आरोग्य, स्वच्छता यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
___________
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.