औशात संस्थात्मक विलगीकरण कक्षात सुविधांचा अभाव - अॅड विजय अष्ठुरे...
औसा मुख्तार मणियार
औसा येथील याकतपूर रोडच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात कोरोना बाधित व संशयितांना विलगीकरण कक्षात ठेवले जाते. परंतु सदर क्वारंटाईन इन्स्टिट्यूटमध्ये अनेक गैरसोयी असून विलगीकरण कक्षात सुविधांचा अभाव असल्याची तक्रार अॅड विजय अष्ठुरे यांनी आ. अभिमन्यू पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. औसा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात ही कोरोनाचा प्रसार झाल्याने याकतपूर रोड स्थित covid-19 केअर सेंटरमध्ये एका खोलीत 10 जणांना भरती केले जात आहे. संस्थात्मक विलगीकरण कक्षात घाणीची समस्या निर्माण होत असून स्वच्छतेचा अभाव आहे. रुग्णांची काळजी घेण्यासाठी अपुरा वैद्यकीय स्टाफ असल्याने वेळेत रुग्णावर उपचार होत नाहीत. क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींना विलगीकरण कक्षात राहावे लागत आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोना बाधित रुग्णांना व संशयितांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याने विलगीकरण कक्षात कोरोना बाधित रुग्णांच्या हाल-अपेष्टा वाढताहेत. औसा मतदार संघाची जनसंख्या लक्षात घेता केवळ दोनच संस्थात्मक विलगीकरण कक्ष असल्याने रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन covid-19 केअर सेंटर मध्ये वाढ करण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात आणि कोरोना बाधित रुग्ण व संशयितांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे अॅड अष्ठुरे यांनी केली आहे. विलगीकरण कक्षात वैद्यकीय कर्मचारी स्टॉफ वाढवावा, रुग्णांना दर्जेदार जेवणाची व्यवस्था करून या परिसरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी अॅड अष्ठुरे यांनी केली आहे. मी स्वतः संस्थात्मक विलगीकरण कक्षात असल्याने covid-19 केअर सेंटरमध्ये उपरोक्त त्रुटी व गैरसोय असल्याची प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीसी बोलताना अॅड अष्ठुरे यांनी दिली आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.