10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना आयटीआय मधील रोजगाराच्या संधीबाबत ऑनलाईन समुपदेशन व करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना आयटीआय मधील रोजगाराच्या

संधीबाबत ऑनलाईन समुपदेशन व करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 

        हिंगोली,दि.25: शेख इमामोद्दीन 

 जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या वतीने इयत्ता 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना आयटीआय मधील रोजगाराच्या संधीबाबत ऑनलाईन समुपदेशन व करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र दि. 29 ऑगस्ट, 2020 रोजी दुपारी 01:00 वाजता google meet वर Meeting https://meet.google.com/tvj-kdjn-kcx या लिंकवर आयोजीत करण्यात आले आहे.

            ऑनलाईन समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सत्रामध्ये 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना आयटीआय मधील रोजगाराच्या संधी या विषयावर अजय भुसारे, शिल्पनिदेशक (कोपा), औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली हे समुपदेशन व मार्गदर्शन करणार आहेत. वेबिनारबाबत काही अडचण आल्यास (02456) 224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

            त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी सद्यस्थिती लक्षात घेता ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे मोफत/विनाशुल्क  सर्वांनी लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

****

                                                          

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 13 रुग्ण; तर 32 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  186 रुग्णांवर उपचार सुरु तर एक जणांचा मृत्यू

        हिंगोली,दि.25: जिल्ह्यात आज 13 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार वसमत परिसर 02 व्यक्ती रॅपीड अँटीजन टेस्ट द्वारे, तर हिंगोली परिसरातील 8 व्यक्ती आणि कळमनुरी परिसर 3 असे एकूण 11 व्यक्ती आरटीपीसीआर टेस्टद्वारे कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर आज 32 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एका 58 वर्षीय पुरुष यांचा कोव्हिड-19 मुळे आज जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.

            सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 14 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 4 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 18 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 1 हजार 362 रुग्ण झाले असून, त्यापैकी 01 हजार 159 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 186 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 17 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या