हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 56 रुग्ण
· 01 जणांचा मृत्यू तर 05 जणांना डिस्चार्ज ; 211 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली, दि.1:शेख इमामोद्दीन
जिल्ह्यात 56 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असून 01 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 05 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.
नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये देवगल्ली, हिंगोली येथील 01 व्यक्ती, जिल्हा परिषद क्वॉर्टर, हिंगोली येथील 03 व्यक्ती, तोफखाना, हिंगोली येथील 01, संमती कॉलनी, हिंगोली येथील 01, मंगळवारा, हिंगोली येथील 01, सवड, हिंगोली येथील 01, चौंढी स्टेशन, हिंगोली येथील 01, जवाहर कॉलनी, वसमत येथील 05, एस.आर.पी.एफ. हिंगोली येथील 33 व्यक्ती, बँक कॉलनी, वसमत येथील 04 व्यक्ती, मंगळवार पेठ, वसमत येथील 01, स्त्री रुग्णालय, वसमत येथील 01, पतंगे कॉलेज समोर, वसमत येथील 01, शेवाळा, कळमनुरी येथील 01 आणि बुरसे गल्ली, कळमनुरी 01 असे एकुण 56 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
तर श्री नगर हिंगाली येथील एका व्यक्तीचा कोवीड-19 ने मृत्यू झाला असून 05 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोविड-19 चे एकूण 654 रुग्ण झाले असून त्यापैकी 435 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 211 रुग्णांवर उपचार चालू असून, कोवीड-19 मुळे आजपर्यंत एकुण 08 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.