खाडगाव च्या स्मशानभूमीत कोरोना रुग्णांचा अंत्यविधी करण्यास ग्रामपंचायतचा विरोध.
" स्थायी समितीचे सभापती अँड. दिपक मठपती यांच्या मध्यस्थीने प्रश्न मिटला."
( व्यंकट पनाळे, मुक्त पत्रकार )
लातूर : दि. १ ऑगस्ट - लातूर शहरालगत असलेल्या खाडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील खाडगाव स्मशानभूमी मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अंत्यविधी करण्यास खाडगाव ग्रामपंचायतने विरोध केला आहे. कोरोना महामारीच्या या कालावधीमध्ये लातूर शहरांतील शासकीय रुग्णालयात असो की शासनाने मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाचा अंत्यविधी हा महानगरपालिके मार्फत लातूर शहरातच केला जातो. आज पर्यंत खाडगाव स्मशानभूमी मध्ये कोरोना रुग्णांचे अंत्यविधी करण्यात आलेले आहेत. मात्र कालच खाडगाव च्या ग्रामपंचायतीने लातूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व महापौर यांना निवेदन देऊन खाडगाव स्मशानभूमित कोरोना बाधित रुग्णांच्या अंत्यसंस्कारा बाबत अक्षेप घेतला आहे. लातूर मधील कोरोना बाधित रुग्णाचे अंत्यसंस्कार खाडगाव येथिल स्ममशानभूमीत करण्यात येवु नयेत. सदरील भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. या रुग्णाच्या अंत्यविधी मुळे या भागातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच सदरील रुग्णाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जळणाचे लाकूड हे अत्यंत कमी प्रमाणात वापरण्यात येत असल्याने त्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढत आहे. परिणामी जनतेच्या अरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे अंत्यविधी खाडगाव स्मशानभूमीत केले जाऊ नये असे निवेदन खाडगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच सौ. सपना योगेश पाटील यांनी देऊन कोरोना रुग्णांचे अंत्यविधी खाडगाव समशानभूमीत करण्यास विरोध केला आहे. परिणामी आज सकाळपासून मयत कोरोना रुग्णाचे अंत्यविधी थांबलेले आहेत.
लातूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती अँड. दिपक मठपती यांनी या प्रकरणात लक्ष घालून ताबडतोब खाडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच व संबंधिताशी चर्चा करून स्मशानभूमीची स्वच्छता तसेच स्मशानभूमीचा परिसर निर्जंतुकीकरण करून घेण्याबाबत आणि अंत्यविधीसाठी भरपूर जळणाचे लाकूड वापरण्यात येईल अशी हमी देऊन कोरोना रुग्णांचे अंत्यविधी करण्याचा मार्ग सोपस्कर केला आहे.
- व्यंकट पनाळे, मुक्त पत्रकार
९४२२०७२९४८
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.