जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 7 रुग्ण; तर 11 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
एकाचा मृत्यू, 364 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली,दि.19: शेख इमामोद्दीन
जिल्ह्यात आज 7 नवीन कोविड-19 चे रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली परिसरातील 5 व्यक्ती, औंढा नागनाथ परिसर 2 व्यक्ती असे एकूण 7 व्यक्ती आरटीपीसीआर टेस्टद्वारे कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज 11 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एका 75 वर्षीय कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 9 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 2 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 11 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 1 हजार 194 रुग्ण झाले असून, त्यापैकी 816 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 364 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 14 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.
****
निवृत्ती वेतन धारकांना माहिती सादर करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.19: जिल्हा कोषागार कार्यालय,हिंगोली येथून घेत असलेले निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन धारकाची माहिती निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये अद्ययावत करावयाची आहे. त्यासाठी निवृत्ती वेतन धारकांचे, कुटुंब निवृत्ती वेतन धारकाचे पूर्ण नाव व पूर्ण पत्ता, पिपिओ क्रमांक, बँकेचा तपशील जसे बँकेचे नाव, शाखेचे नाव व खाते क्रमांक, पॅन कार्ड (झेरॉक्स प्रत जोडावी), मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी असल्यास ही मुद्देनिहाय माहिती दिनांक 15 सप्टेंबर, 2020 पर्यंत to.hingoli@zillamahakosh या ई-मेल आयडी वरच संबंधीतांनी पाठवावी.
याकरीता साठी कार्यालयात येण्याची गरज नसून सद र माहिती ई-मेल द्वारे पाठविण्यात यावी अथवा जिल्हा कोषागार कार्यालय, हिंगोली यावर पत्र व्यवहार करावा. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.