लॉकडाऊनमध्ये जिल्हयातील 20 लाख
लाभार्थ्यांना नियमितपणे अन्नधान्याचे वितरण
-पालकमंत्री अमित देशमुख
*खाजगी रुग्णालयांसाठी 80 टक्के खाटा कोवीड रुग्णांसाठी राखीव
*आजपर्यंत 42 हजार पेक्षा अधिक कोविडच्या तपासण्या
*महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्हयातील 49 हजार शेतकऱ्यांना 302 कोटीचे बँक खात्यावर वितरण
*खरीप हंगाम 2020-21 मध्ये शेतकऱ्यांना 1 हजार 31 कोटीच्या पीक कर्जाचे वितरण
*कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपला लढा हा कोवीड आजाराशी आहे, आजारी व्यक्तींशी नाही.
*जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही
लातूर दि.19(जिमाका):- लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जिल्हयातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व एपीएल शेतकरी योजना अशा एकूण 20 लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना गहू व तांदूळ या अन्नधान्याचे वितरण नियमितपणे करण्यात आलेले आहे. तसेच जिल्हयातील 19 शिवभोजन केंद्रामार्फत प्रतिदिन 2 हजार थाळयांचे वितरण झाले व जिल्हयातील एक ही गरजू लाभार्थी अन्नधान्य व शिवभोजन थाळीच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्हयातील 13 खाजगी व 8 शासकीय अशा एकूण 21 रुग्णांलयात या योजनेचे लाभार्थी नसणाऱ्या व्यक्तींना उपचार अनुज्ञेय करण्यात आलेले आहेत. तसेच जिल्हयातील खाजगी रुग्णांलयातील 80 टक्के खाटा कोवीड रुग्णांसाठी आरक्षित केलेल्या आहेत. तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, सामान्य रुग्णालय उदगीर, तालुकास्तरावरील सर्व रुग्णालये, कोवीड केअर सेंटर, डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल व खाजगी रुग्णालयातील आरक्षित केलेल्या खाटा अशा सर्व रुग्णालयात जवळपास 7 हजार खाटांची कोवीड रुग्णांसाठी उपलब्ध्ता करुन ठेवलेली आहे. तसेच कोवीड रुग्णांना प्रशासकीय यंत्रणेमार्फत या ठिकाणी उत्कृष्ट प्रतिचे प्रथिनयुक्त सकस आहार वेळेत दिला जात आहे.अशी माहिती पालकमंत्री देशमुख यांनी दिली.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 72 हजार शेतकरी पात्र असून 54 हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे. यापैकी 49 हजार शेतकऱ्यांना 302 कोटी लाभाची रक्कम बँक खात्यावर हस्तांतरीत झालेली आहे.सन 2020-21 मध्ये खरीप हंगामा करीता 2 लाख 10 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 31 कोटींचे पीक कर्ज वाटप झालेले आहे. संपूर्ण देश व राज्यात टाळेबंदी असल्याने लातूर जिल्हयातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर कापूस विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शासनाने 17 वर्षानी पानगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरु करुन येथील सर्व शेतकऱ्यांच्या 39 हजार क्विंटल कापसाची खरेदी केली व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत माहे एप्रिल 2020 पासून विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कार्यान्वीत करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना जलद स्वॅब तपासणीची सुविधा येथेच उपलब्ध् झाली. या प्रयोगशाळेचा लाभ लातूरसह उस्मानाबाद व बीड जिल्हयालाही झाला. येथे आजपर्यंत आरटीपीसीआर 19 हजार व रॅपीड अँटीजेन टेस्ट 23 हजार अशा एकूण 42 हजार पेक्षा अधिक कोवीड टेस्ट करण्यात आल्या. रॅपिड अँन्टीजन किट्सची मोठया प्रमाणावर मागणी करण्यात आली असून अत्यंत जलद पध्दतीने स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त होईल. यामुळे दैनंदिन स्वॅब तपासणीची संख्या मोठया प्रमाणावर वाढवून ट्रेसिंगचे काम प्रशासनाच्या वतीने केले जात असल्याने कोवीडचा प्रार्दुभाव इतरत्र होण्यास प्रतिबंध होत आहे व ही एक दमेची बाजू असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालय लातूर या संस्थेचे नाव दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था असे करण्यात आले. या संस्थेचे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलची इमारत कोवीड रुग्णांसाठी उपलब्ध् करुन देण्यात आली. भविष्यात वाढती कोवीड रुग्णांची संख्या लक्षात घेऊन या संस्थेतील रुग्णालयातील सर्व खाटांना ऑक्सीजनचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच कोवीड रुग्णांच्या उपचाराकरिता प्लाझ्मा थेरपी युनिट कार्यान्वीत झाले आहे. तरी कोरोनावर मात केलेल्या कोरोना योद्ध्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी केले.
संपूर्ण जगात कोवीड-19 विषाणूने थैमान घातलेले आहे. आपला देश व संपूर्ण राज्यात कोवीड विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु ठेवलेली आहे. आपल्या जिल्हयात सर्व यंत्रणा कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. प्रबोधनात्मक मोहिमे अंतर्गत दैनंदिन प्रसारित फेसबुक लाईव्ह, तसेच अँटी कोरोना पोलिस, अँटी कोरोना फोर्स या नावीन्यपूर्ण संकल्पांमुळे कोरोना प्रतिबंधास मदत झाली आहे.फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात प्रशासन थेट हजारो लोकांपर्यंत पोहोचले असून दुहेरी संदेश व सूचनांची देवाणघेवाण होत असल्याने नागरिकांना तात्काळ माहिती मिळत आहे. तर प्रशासनाला कोरोनाच्या उपाययोजना राबविण्यासाठी मदत होत आहे असे श्री.देशमुख यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभमीवर संपूर्ण देशात व राज्यात मार्च 2020 मध्ये संपूर्ण टाळेबंदी जाहीर करण्यात आली.जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हयात राबविण्यासाठी विविध आदेश जारी केले. तसेच कोवीड-19 पासून बचावा बाबत प्रशासनाने प्रबोधनात्मक मोहिम राबवून शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. आपला लढा हा कोवीड आजाराशी आहे, आजारी व्यक्तींशी नाही. त्यामुळे नागरिकांनी कोवीड रुग्ण् व त्यांच्या कुटुंबियांशी कोणत्याही प्रकारच्या भेदभावाची वर्तणुक करु नये. व त्यांना सहकार्य करुन कोरोनावर मात करण्यासाठी त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. कोवीड साथ रोगांशी लढा देत असलेल्या डॉक्टर्स, नर्स, आरोग्य दूत, सफाई कामगार, अंत्यविधी करणारे, समुपदेशक, कोरोनावर मात करणारे आबाल-वृध्द या सर्व कोरोना योध्दांचे कौतुक असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगून कोरोना प्रतिबंधासाठी शासन व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना जसे विनाकारण घराबाहेर न पडणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात साबणाने स्वच्छ व नियमित धुणे, भौतिक अंतराचे पालन करणे, याचे नागरिकांनी तंतोतंत पालन करण्याचे आवाहन ही त्यांनी केले.
कोविड-19 च्या नियंत्रणासाठी लातूर जिल्ह्यात आरोग्य सेवा व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळी च्या यापूर्वी लॉक डाऊन घोषित करण्यात आला होता. या काळात आरोग्य यंत्रणेने ट्रेस, टेस्ट अँड ट्रीट या त्रिसूत्रीची अंमलबजावणी केली व ती कमालीची यशस्वी झाली. 17 ऑगस्ट पासून सर्व बंधने उठवण्यात आली आहेत. त्यानंतर टेस्ट,टेस्ट अँड टेस्ट ही कार्यपद्धती स्वीकारण्यात आली असून या कार्यपद्धतीस नागरिकांचे योग्य सहकार्य मिळाल्यास कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याचा जो उद्देश आहे तो नक्कीच यशस्वी होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली. तसेच विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला लातूर जिल्हा सामाजीक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतीक क्षेत्रात चांगली
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.