पान शॉपधारकांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी

 

पान शॉपधारकांना व्यवसाय सुरु
करण्याची परवानगी देण्याची मागणी




लातूर,दि.१९ः लातूर शहरातील जवळपास ८ हजार कामगारांचे पान शॉप दुकानांवर जीवन अवलंबून असून, इतर सर्व व्यवसायाप्रमाणे पान शॉप सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी लातूर पानशॉप व्यापारी असोसिएशनने लातूर शहर महानगरपालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या मार्च २०२० पासून लातूर कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने पान शॉप ची सर्व दुकानेही आजपर्यंत बंद आहेत. या पान शॉपच्या धंद्यात लातूर शहरातील जवळपास आठ हजार कामगारांच्या परिवाराचे  जीवन अवलंबून आहे.  काम बंद बसल्याने या सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आहे.या कामगारांकडे जगण्यासाठीचे अन्य साधन वा पर्याय नाहीत, त्यामुळे आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.
आज घडीला लातूर शहरातील जवळपास सर्वच व्यवसाय निर्बंधासह चालू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली आहे, त्याप्रमाणे पान शॉप या व्यवसायासही परवानगी द्यावी व या व्यवसायावर अवलंबून असणार्‍या कामगारांची उपासमार होणार नाही,व्यवसायासंदर्भात सर्व नियमांचे पालन करुन व कोरोनासाठी लागू असलेले सर्व नियम सांभाळण्याची आम्ही हमी देत आहोत,असे सदरील निवेदनात लातूर पानशॉप व्यापारी असो.चे अध्यक्ष संतोष नरवटे,सचिव जानूखॉंन पठाण व उपाध्यक्ष मसुद काजी यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या