कॅन्सरशी झुंज देत पृथ्वीराजची यशाला गवसणी ; दहावीत 98 टक्के गुण
निलंगा/मोईज सितारी
कॕन्सरसारख्या आजाराला झुंज देत व अर्धे शैक्षणिक वर्षे रूग्णालयातच घालविणा-या पृथ्वीराज किशोर जाधव यांने मिळविले शालांत परीक्षेत ९८% गुण....
दहावीच शैक्षणिक वर्ष तस महत्वाचं..... शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीपासून अभ्यासाचे नियोजन..क्लासेस आणि किती वेळ अभ्यास करायचा असे सर्व नियोजन केले जाते... मात्र, निलंगा तालुक्यातील धानोरा गावचा पृथ्वीराज याला अपवाद आहे....निम्म्म वर्ष कॅन्सरसारख्या आजाराला झुंज देण्यात गेलं असतानाही त्याने तब्बल 98 टक्के गुण मिळवले आहेत. वेळप्रसंगी त्याने रुग्णालयात रात्रीचा दिवस करून हे यश मिळवले आहे.
निलंगा तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी किशोर जाधव यांना अवघी ३ एकर जमीन दोन मुली एकच मुलगा मुले शिकवायची म्हणून त्यांनी लातूर येथे भाड्याने रूम करून स्वताच्या पत्नीला तिथे मुलांच्या व्यवस्थेसाठी ठेवले लातूर येथिल केशवराज विद्यालयात प्रवेश मिळवून दिला. परंतु मुलाला प्रकृती अस्वस्थता जाणवत असल्याने त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यात त्याला कॕन्सर असल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे त्याला मुंबई येथिल टाटा कॕन्सर हाॕस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले.तेथे त्याच्यावर उपचार चालू झाले.मुख्यमंत्री सहायता निधीतून व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आर्थिक मदतीने पृथ्वीराज याच्यावर टाटा रूग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली आणि ती यशस्वीपणे पार पडली परिस्थिती बेताची असल्याने आम्ही एवढा मोठा खर्च करूच शकलो नसतो माञ आमदार निलंगेकर यांच्या मदतीने आम्हाला खुप मोठी मदत झाली आणि माझ्या मुलाला या आजारावर मात करता आली.परंतु आम्हाला चिंता होती त्याच्या दहावी शैक्षणिक वर्षाची ९ वी संपूर्ण वर्षे रूग्णालयातच उपचार घेताना गेले आणि दहावीचे अर्धे वर्षे पण रूग्णालयातच गेले यामुळे आम्हाला चिंता वाटत होती आजारी असल्यामुळे एवढे वर्षे वाया गेले तरी चालेल असे पण तो बरा झाला पाहिजे म्हणून आम्ही शिक्षणाची चिंता सोडली डॉक्टरने शाळेत पाठवू नका त्यामुळे त्याला पुन्हा संसर्ग होईल आणि आजार वाढेल असे सक्तीने सांगितले होते.प्रथम सञाच्या परीक्षा झाल्या होत्या त्यानंतर तो शाळेत जाऊ लागला व दोन तीन पाठ करून घरी यायचा घरी आल्यानंतर आभ्यास करायचा माञ त्याच्यावर आभ्यासाचा ताण आम्ही पडू दिला नाही तू प्रकृतीची काळजी
घे परीक्षा काय पुन्हा पण देता येतात असे सांगायचे डॉक्टरने पण त्याला तोच सल्ला दिला होता. डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे नेहमी तो बी पाॕझीटीव्ह विचार करत असतो अशा आमच्या हालाकिच्या आर्थिक परिस्थितीत पृथ्वीराजने जगण्याची व शिक्षणाची कास सोडली नाही पास होईल माञ एवढे चांगले गुण घेऊन पास होईल असे आम्हाला वाटत नव्हते माञ आमच्या मुलाने कॕन्सर सारख्या मोठ्या आजारावर मात करत ९८ टक्के गुण घेतला याचा आम्हाला आनंद झाला आहे असे त्याचे वडील म्हणाले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.