*केळगावमध्ये स्वातंत्रदिनादिवशीच ए.पी.जे. कलाम चौक नामकरण*
निलगा प्रतिनिधी:
आज स्वातंत्र्य दिन आनंदाच्या दिवशी केळगाव मध्ये भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल यांच्या नावने मुख्य चौकाचे नामकरण करण्यात आले.
निलंगा तालुक्यातील केळगाव येथे आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व साधून.केळगाव गावातील मुख्य चौकाला महापुरुष माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ऐ पी जे अब्दुल कलाम चौक असे नाव देऊन देऊन त्याचे उदघाटन काँग्रेसचे युवा शेतकरी नेते अभयदादा सोळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.महापुरुषांचा आचार-विचार आपल्या जीवनात व्हावा व आपले सामाजिक जीवन प्रतिभासंपन्न व्हावे व डॉ कलाम यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहावा या हेतूने ह्या नवीन चौकाचे नामकरण सोहळा पार पडला त्यावेळेस सर्वांनी डॉ ए पी जे अब्दुल कलाम जिंदाबाद! भारत माता की जय !! च्या घोषणा दिल्या
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन आपल्या भारत देशाला आनुअस्त्रा, शोध लावून देऊन ,जगात भारताची मान अभिमानाने उंचावून भारत देशाच्या राष्ट्रपती पद भूषवणाऱ्या डॉ अब्दुल कलाम हे महापुरुष भारतासह संपूर्ण जगात सदैव अमर आहेत व राहतील असे मत अभयदादा सोळुंके यांनी मांडले .
त्यावेळी प्रमुख पाहुणे दापक्याचे माजी सरपंच शकील पटेल,राठोडा गावचे कुमार राजे सह केळगावचे माजी सरपंच शकील पांढरे,समद पांढरे,बाबुराव राठोड,रावण कांबळे,फारूक पांढरे,तंटामुक्ती आद्याक्ष सुभाष कांबळे,विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन शिवाजी चव्हाण,मधुकर चव्हाण,बालाजी पाटील, सुधाकर चव्हाण,रामेश्वर गवारे,अंगद काळे,दशरथ कांबळे,गोपाळ राठोडकर,पत्रकार जावेद मुजावर,ग्रामपंचायत लिपिक अहेमद शेख,बालाजी पेठकर,शिवाजी कांबळे,सत्यवान सूर्यवंशी सह गावकरी उपस्थित होते .सर्वांनी घोषणा देत टाळ्यांचा कडकडाट करत आनंद व्यक्त केला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.