१६ ऑगस्ट रोजी लातूर शहरात कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथीक औषधाची फवारणी. स्व. श्रीकृष्णजी सोनी यांचे स्मरणार्थ लायन्स क्लब लातूर सेंट्रल व महानगरपालिकेचा संयुक्त उपक्रम.

 १६ ऑगस्ट रोजी लातूर शहरात कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथीक औषधाची फवारणी. 

स्व. श्रीकृष्णजी सोनी यांचे स्मरणार्थ लायन्स क्लब लातूर सेंट्रल व महानगरपालिकेचा संयुक्त उपक्रम.  





लातुर : दि. १५ - लायन्स क्लब लातूर सेंट्रल व लातूर महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव, वरळी (मुंबई) नागपूर इंदोर तसेच अहमदाबादच्या धरतीवर संपूर्ण लातूर शहरांत होमिओपॅथिक औषधांची फवारणी करण्यात येनार आहे. वरील शहरांमध्ये अशा फवारणी केल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे लातूर शहरात हा उपक्रम राबवण्यात येत आहे.  

या उपक्रमाचा शुभारंभ लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या शुभहस्ते १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता महात्मा गांधी चौकातून होणार आहे. ही फवारणी १६ ते २० ऑगस्ट या कालावधीत केली जाणार असुन लातूर शहरातील सर्व मुख्य रस्ते तसेच शहरातील लहान गल्लीबोळातही होमिओपॅथिक औषधाची फवारणी करण्यात येणार आहे. या औषधी मध्ये सेपिया २०० हे प्रमुख औषध घटक आहे.  

या कार्यक्रमास उपमहापौर चंद्रकांतजी बिराजदार, स्थायी समितीचे सभापती अँड. दिपक मठपती, महानगरपालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, माजी महापौर सुरेश पवार, नगरसेवक अशोक गोविंदपुरकर, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाँयन्सचे अध्यक्ष चंद्रकांत धमगुंडे असतील. होमिओपॅथिक तज्ञ लाँ. डॉ. श्यामसुंदर सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य संपन्न होणार आहे. लाँ.डॉ. जयंती आंबेगावकर व लाँ. रवी असोपा हे  संयोजक आहेत. लातूर महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त नंदा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधिकारी कलीम शेख यांच्या व्यवस्थापनात हा उपक्रम संपन्न होईल.  

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लबचे अंजू सोनी, भरत हंचाटे, प्रसाद हंचाटे, राजु खंडेलवाल, राजकुमार अग्रवाल, शोभा धमगुंडे, प्रतीक हंचाटे, श्रीकृष्ण कोटलवार, श्याम हरीयाणी, राजेश पत्रिके, अक्षय डावरे, रत्नप्रभा पत्रिके, दिलीप सोमाणी,  हनुमंत भांगे, संध्या कोटलवार आणि महानगरपालिकेचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. 


- व्यंकट पनाळे, मुक्त पत्रकार 

   ९४२२०७२९४८

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या