बेलकुंडच्या अवैध दारू विरोधात ग्रामस्थांची समिती.
बोकाळलेल्या अवैध दारूविक्रीमुळे गावातील तंटे वाढत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने या अवैध दारूविक्री विरोधात बेलकुंड बुधवार दि. ५ आॅगस्ट रोजी येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने एक समिती गठीत केली असून याव्दारे गावातील अवैध दारूविक्रीवर अंकुश ठेवला जाणार आहे.
भादा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेलकुंड (ता. औसा) येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री सुरू आहे. यामुुळे गावातील सामाजिक सलोखा बिघडत आहे. याचा परिणाम गावातील शांततेला बाधा ठरत आहे. यामुळे ही अवैध दारूविक्री बंद करावी अशी मागणी महिला व सामान्य ग्रामस्थांकडून केली जात होती. या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (ता. पाच) झालेल्या एका बैठकीत गावातील अवैध दारूविक्री बंद करावी यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून याव्दारे यावर अंकुश ठेवला जाणार आहे. बेलकुंड हे औसा - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गाव असून याठिकाणी विविध शासकीय कार्यालये व बाजारपेठ असल्याने परिसरातील अनेक गावातून ग्रामस्थ येथे येतात. मात्र अवैध दारूविक्रीमुळे या ग्रामस्थांना तळीरामाचा नाहाक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे गावात सुरू असलेली अवैधदारू विक्री बंद व्हावी यासाठी ग्रामपंचायतीने एक समिती गठीत केली यावेळी या बैठकीला ग्रामपंचायत सदस्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.