*माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची शिकवण व कार्य कायम प्रेरणा देत राहील*
*पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडून निलंगेकर कुटूंबीयांचे सांत्वन*
लातूर( प्रतिनिधी):
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, हैदराबाद मुक्ती लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्याच्या आणि लातूर जिल्हयाच्या विकासात मोठ योगदान दिले आहे. त्यांचे हे कार्य आणि शिकवण कायम प्रेरणा देत राहील असे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे बुधवारी पहाटे निधन झाले, सांयकाळी निलंगा येथे त्याच्या पार्थीवावर अत्यसंस्कार करण्यात आले. या अत्संस्कारासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख लॉकडाऊनमुळे मुंबई येथुन मोटारीने निलंगा येथे निघाले मात्र रस्त्यातील सततचा पाऊस व अन्य कारणामुळे त्यांना पोहचण्यास उशीर झाला. बुधवारी रात्री ८ वाजता पालकमंत्री देशमुख यांनी निलंगा येथे अशोका निवास्थानी जाऊन डॉ डॉक्टर निलंगेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली त्यांच्या कुटुंबीयाचे सांत्वन केले. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांची शिकवण आणि कार्य आपल्याला कायम प्रेरणा देत राहील असे त्यांनी म्हटले आहे.
या प्रसंगी श्रीमती सुशीलाताई पाटील निलंगेकर, डॉ. शरद पाटील, निलंगेकर, अशोकराव पाटील निलंगेकर, विजय पाटील निलंगेकर माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, डॉ डावळे डॉ चंदाताई डावळे व निलंगेकर परिवारातील इतर सदस्य उपसिथत होते. तसेच लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातुर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, पृथ्वीराज शिरसाठ सचिन दाताळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
------------------------------ ----------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.